Festival Posters

मोबाईल चोरट्याला धाकड गर्ल नेहाने शिकवली अद्दल

शुक्रवार, 19 जुलै 2019 (13:57 IST)
हल्ली साखळीचोर, खिसेकापू आणि मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. रस्त्यावरून चालताना असो वा गाडीतून प्रवास करताना असो, आपल्या सामानाची काळजी घेणं आणि त्याहून आधिक सतर्क राहणं गरजेचं झालं आहे. बिग बॉस मराठी सीजन २ ची स्पर्धक नेहा शितोळेने तिच्यासोबत घडलेला असाच एक किस्सा नुकताच शेअर केला. रात्रीच्या प्रहरी सिनेमा बघितल्यानंतर नेहा टॅक्सीतून घरी जात होती. तेव्हा, सिग्नलवर गाडी थांबली असताना, नेमका सिग्नल सुटायच्या वेळेत खिडकीतून हात टाकत मोबाईल लंपास करण्याचा प्रयत्न चोराने केला. नेहाने प्रसंगावधान दाखवत त्याचा हात धरला, आणि टॅक्सी ड्रायवरला गाडी चालू करत पुढच्या चौकात नेहण्यास सांगितले. तोपर्यंत तिने त्या चोराचा हात घट्ट पकडून ठेवला होता. टॅक्सी थांबविल्यानंतर मग नेहाने त्याला भर रस्त्यात चांगलेच चोपले. ईतक्या कष्टाने आणि मेहनतीने विकत घेतलेला मोबाईल, ही नाणसं एका सेकंदामध्ये कसे काय चोरून पळू शकतात! याचा तिला प्रचंड राग आला होता, आणि त्यामुळे तिने त्या चोराला चांगलीच अद्दल घडवली. पुढे त्या चोराला तिच्या हातून सुटत पळून जाण्यात यश तर आलेच, परंतू तोपर्यंत आपल्या धाकड गर्लच्या फटक्यांनी त्याला त्याचे सात जन्म आठवले!

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

The Odyssey Review क्रिस्टोफर नोलनचा 'द ओडिसी' भव्य आणि मंत्रमुग्ध करणारा; मॅट डेमनचा दमदार अभिनय!

आमिर खानने सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर मौन सोडले

सोहेल खानचा लैंगिक शोषणाबाबत हृदयद्रावक खुलासा; घटस्फोटावरही व्यक्त केली खंत!

अभिनेता सयाजी शिंदे यांची सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला थेट साद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

शिक्षकांनी मला आयएएस किंवा आयएफएस अधिकारी व्हायला सांगितले अभिनेत्री अर्चना पुरण सिंगचा खुलासा

पुढील लेख
Show comments