1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2019 (15:52 IST)

रूपालीच्या चाहत्याने लिहिले तिच्यासाठी पत्र

rupali bhosale
'बडी दूर से आए हैं' आणि 'जबान संभालके' सारख्या हिंदीच्या गाजलेल्या विनोदी मालिकेतून प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसलेचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ हिंदीच नव्हे तर तिने मराठीत 'करून गेलो गाव' हे नाटक आणि अनेक मालिकांमध्ये काम केले असल्यामुळे मराठी प्रेक्षकवर्गातही ती प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, तिच्या नावाने तिच्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनेक फॅन्स क्लब सुरू केले आहेत. सध्या रूपाली बिगबॉस मराठी सीजन २ च्या घरात आहे, त्यामुळे बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क जरी होत नसला, तरी तिचे चाहते विविध प्रकारे तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न निखिल राणे नामक एका चाहत्याने केला आहे. त्याने रुपालीला पत्र लिहीत, आपल्या भावना व्यक्त केल्या. रूपालीच्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवणे शक्य नसल्यामुळे त्याने ते त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहे. 
बिगबॉसच्या घरात आतापर्यंत अनेक घडामोडी घडून गेल्या असून, दिवसेंदिवस टास्कदेखील अवघड होत आहेत. रूपालीदेखील आपली खेळी चांगल्याप्रकारे खेळत आहे. बाहेरून तिच्या चाहत्यांचा तिला भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.