Dharma Sangrah
✕

एमएक्स प्लेयर घेऊन येत आहे 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' #WeekendBingeOnMX

Updated: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (17:42 IST)
 
अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित आहे. सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के या दोन धाडसी पोलिसांची ही कथा आहे, जे आपले शहर सुरक्षित राहावे, म्हणून सदैव तत्पर असतात. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचे चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक सारंग साठे सांगतात, "मुंबई सारख्या मोठ्या शहराचे रक्षण करणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे हे व्रत आचरणात आणावे लागते. मुंबईसारख्या शहराचे रक्षण करण्यासाठी धाडसी आणि निडर मन असावे लागते. आपल्या मुंबई पोलिसांमध्ये हे सर्व गुण आहेत. म्हणूनच आपण आपल्या घरात, शहरात सुरक्षित आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी ही सर्व मंडळी रात्रंदिवस झटत असतात. ही कथा माझ्या खूप जवळची असण्याचे आणखी एक कारण म्हणजे यात स्त्री आणि पुरुष पोलीस खाकी वर्दी असताना आणि नसताना त्यांचे जीवन कसे असते, याचे दर्शन घडते. सरतेशेवटी पोलीस सुद्धा तुमच्याआमच्या सारखा एक माणूसच आहे. पोलिसांच्या न पाहिलेल्या आयुष्याचा आढावा अतिशय रंजक पद्धतीने या वेबसिरीजच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.'' 
 
एमएक्स प्लेयरच्या 'वन्स अ  ईअर' या वेबसिरीजमध्ये प्रेमाला मिळालेले एक अद्भुत वळण पाहायला मिळणार आहे. मंदार कुरुंदकर दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका असून सहा भागांच्या या वेबसिरीजमध्ये या दोघांच्या प्रेमाचा सहा वर्षांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या मैत्रीपासून ते प्रेमाची जाणीव होईपर्यंतचे सर्व अनमोल आणि अविस्मरणीय क्षण यात बघता येतील. या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक मंदार कुरुंदकर म्हणतात, "कोणत्याच प्रेमकथेची सुरुवात ही पहिल्याच नजरेत होत नाही. कोणीही पहिल्याच भेटीत आपल्या शाश्वत प्रेमाची कबुली देत नाही. यासाठी काही काळ जावा लागतो. या वेबसिरीजमध्ये एका जोडप्याच्या जीवनात त्यांचे प्रेम प्रत्येक टप्यावर कसे फुलत जाते आणि अधिक मजबूत होते, हे पाहायला मिळेल. निपुण आणि मृण्मयी सोबत काम करताना खरंच खूप मजा आली. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मला खूप खुश केले."
 
      या वेबसिरीजमध्ये काम करण्याच्या अनुभवाबद्दल निपुण सांगतो, "माझा प्रेमावर खूप विश्वास आहे. या वेबसिरीजमधून आपल्याला दोन व्यक्तींच्या प्रेमाचा सहा वर्षांचा चढ-उतारांनी भरलेला प्रवास पाहायला मिळणार आहे. त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी आणि त्यांचे मतभेद सुद्धा यात पाहायला मिळतील. मला विश्वास आहे, की जी जोडपी आता प्रेमात आहेत त्या सर्वांच्या या सोनेरी काळाला नक्कीच ही वेबसिरीज जोडली जाईल."

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

आमिर खानचा पुतण्या अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस; देश सोडण्याचे अल्टीमेटम

'रामायणा'तील जटायूची पहिली झलक समोर आली! अनुपम खेर यांच्या आवाजातून धर्म आणि शौर्याचा संदेश दिला जात आहे

१८ महाशक्तीपीठांपैकी एक मैसूरची चामुंडेश्वरी देवी आणि दसरा उत्सवाचे धार्मिक महत्त्व

कपाळावर टिळा लावल्यामुळे एकता कपूर ट्रोल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

कॉफी विथ करण ९ मध्ये करिश्मा कपूरची सरप्राईज एन्ट्री

पुढील लेख
Show comments