बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (12:11 IST)

नेत्यांचा किरण माने यांना पाठिंबा

मराठी वाहिनीमधील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांना सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्वरत आल्यानंतर आता लोकांकडून माने यांना पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या चाहत्यांपासून ते नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे.
 
राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शविला आहे. माने केंद्र सरकारविरोधात लिहतात म्हणून त्यांना हटवलं गेलं. कुणाच्या भाकरीवर टाच आणणं चुकीचं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. त्यांनी आपली भूमिका ट्विटद्वारे मांडली आहे.
 
“या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल. देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला गेला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासतो. स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने हा अभिनेता फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहतो. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो, म्हणून अचानक मालिकेतूल काढुन टाकले गेले. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 
'कोणतीही राजकीय भूमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे. किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल, तर हे अन्यायकारकच आहे,' अशी प्रतिक्रिया समीर विद्वांस यांनी त्यांनी ट्विटरद्वारे दिली.
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दडपशाही वृत्तींना मोठा अडसर असल्याने ही वृत्ती नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठेचण्याचा प्रयत्न करते. राजकीय भूमिका मांडली असता एखाद्या कलाकाराला मालिका सोडण्याची वेळ यावी;याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खुनच म्हणावा लागेल. असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, माने यांना मालिकेतून काढून टाकल्यामुळे सोशल मीडयावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे माने यांनी दोन ओळींची फेसबुक पोस्ट टाकत सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा…गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा,” असे म्हणत मतं व्यक्त करतच राहणार अशी भूमिका घेतली आहे.