जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं लग्न का ठरतेय वेगळ..!
बड्या राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्नाचा थाट गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. अनेकांच्या लग्नात तर कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत लग्ने उरकली. मात्र याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड अपवाद ठरलेत, त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला आहे. नताशा आव्हाड ही जितेंद्र आव्हाडांची एकुलती एक कन्या आहे. नताशा आव्हाडचं लग्न एलन पटेलसोबत झालं असून दोघे आज विवाहबंधनात अडकले. आपल्या लेकीच्या लग्नात वायफळ खर्च न करता किंवा कोणताही बडेजावं न करता साध्या पद्धतीने रजिस्टर करत लग्न केले आहे.
दरम्यान मूळचे नाशिकचे असलेले जितेंद्र आव्हाड यांचा चाहता वर्ग नाशकात आहे. त्यांच्या लेकीच्या लग्नानिमित्त येथील बाळा दराडे यांच्यासह सहकाऱ्यांनी रामकुंडावर असलेल्या गोर गरीब नागरिकांना जेवण दिले आहे. आणि एक नवा आदर्श घालून दिला आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड हे नाशिकचे असल्याने त्यांची नाशिकशी नाळ कायम जोडली गेली आहे. येथील कार्यकर्ते बाळा दराडे यांनी आज आव्हाड यांच्या लेकीच्या विवाहनिमित्त रामकुंडावरील गोर गरिबांना भोजन दिले. त्यामुळे इतरांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. या विवाह सोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांनी मुलीचे लग्न साधेपणाने करणे आदर्शवत आहे