गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (12:02 IST)

प्रार्थना बेहरे लवकरच अडकणार विवाह बंधनात

अभिनेत्री प्रार्थना बेहरे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत तिचा विवाह येत्या 14 नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्त बेहरे कुटुंबात लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतेच लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले.
 
प्रार्थनाने आपला जोडीदार आई-वडीलांच्या पंसतीने निवडला आहे. एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने अभिषेक आणि प्रार्थनाची ओळख झाली. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, जेव्हा तुमच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो, तेव्हा तुम्हाला माहित असते की तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे. तिचे कॉफी आणि बरंच काही, मितवा, मिस्टर अँड मिसेस सदाचारी हे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट झाले होते.