Dharma Sangrah
✕

चांगला नट म्हणून नाव कमवेन मगच लग्न !

Updated: मंगळवार, 26 सप्टेंबर 2017 (09:51 IST)
अभिनयाच्या वेडापायी घरदार सोडून मुंबईत दाखल झाले आणि यशस्वी झाले किंवा स्पॉटबॉय बनले अशा अनेक कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या. पण जोवर अभिनेता म्हणून नावारुपास येत नाही तोवर लग्नच करणार नाही, असा पण केलेला एक अभिनेता आहे...शरद जाधव! मराठीतला नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणून एकांकिका चळवळीत ओळखला जाणारा शरद जाधव, घुमा या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारतो आहे. फोक्सवॅगनच्या जर्मन, फेसबूकच्या अमेरीकन आणि पोलंडच्या मॉलच्या जाहिरातीत झळकलेल्या शरदने काही तेलगू जाहिरातीतून काम केले आहे. शरद, गेली १५ वर्षै नाटक, जाहिरात आणि सिनेमात अभिनयाच्या जोरावर मुख्य भूमिका मिळावी म्हणून धडपडतोय. परंतू, छोट्या-मोठ्या भूमिकांवरच त्याला आजवर समाधान मानावं लागल्याने त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या 34 व्या वर्षीही तो अविवाहीत आहे.
 
मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा- ख़डले परमानंदचा शरद जाधव, अभिनयाच्या वेडापायी शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात दाखल झाला. पुण्यात टेक्सास गायकवाड यांच्या प्रबुद्ध रंगभूमी संस्थेतून एकांकिका-नाटकातून कामं करू लागला. बऱ्याच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकातून त्याने छोटी-मोठी  कामं केली. फोक्सवॅगन, फेसबुक सारख्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीही केल्या परंतु स्वत:चं पोट भरण्याचीही भ्रांत झालेल्या शरद जाधवला घरातून विरोध होऊ लागला. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्याचं लग्न लावून देवू मग सुधरेल, या भाबड्या आशेपायी मुली पाहायला सुरूवात केली. आता आपल्याला कुठेतरी नोकरी करावी लागणार आणि आपलं ध्येय संपणार! यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शरदने घरच्यांना लग्न करेन पण अभिनेता म्हणून नावारूपास येऊनच करेन ! असं ठणकावून सांगितलं. तिथंपासून आजपर्यंत शरद अविवाहीत आहे. पण, आता घुमा या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित सिनेमात त्याला हिरो म्हणून भूमिका मिळाली आहे.
 
आपल्या हुशार मुलाला जिल्हापरिषदेच्या शाळेतून काढून इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या एका शेतकरी बापाची...’नामा’ची प्रमुख भूमिका शरद जाधव साकारतोय. या चित्रपटाची गोष्ट ही ‘नामा’ या व्यक्तिरेखेभोवती फिरते त्यामुळे शरद जाधव या चित्रपटाचा खरा हिरो आहे. आता मायबाप प्रेक्षकांच्या कृपाशिर्वादाने घुमा ला घवघवीत यश मिळू दे आणि माझ्या लग्नाकडे डोळे लावून बसलेल्या माझ्या आईबाबांचं स्वप्न आणि माझा कलेप्रती केलेला त्याग फळू दे! अशी  आशा शरद जाधवने व्यक्त केली.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर या देवी मंदिराचे दर्शन घेणे अत्यंत फलदायी; दसऱ्याचा आनंद द्विगुणित होतो

Tiger Shroff Firing Case मुंबई पोलिसांनी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा केला, म्हणाले.....

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस २० मधून काही काळासाठी ब्रेक घेण्याचा सलमान खानचा निर्णय

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

पुढील लेख
Show comments