Festival Posters
✕

शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा 'शिक्षा' लघुपट

Updated: गुरूवार, 7 जून 2018 (17:32 IST)
 
'
कलाश्री इंटरटेनमेंट' निर्मित 'शिक्षा' या लघुपटाचे पोस्टर आणि ट्रेलर नुकतेच लॉन्च झाले असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या लघुपटातून 'गाव गाता गाजली' फेम बालकलाकार सार्थक वाटवे एका नव्या रूपात आपल्या समोर येत आहे. या मालिकेत क्रिशच्या भूमिकेत दिसलेला सार्थक या लघुपटात प्रमुख आणि एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.
आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला काही गरीब मुलांना काम करताना पाहतो, जसे रस्त्यावर वृत्तपत्र आणि खेळणी विकणे, बूट पॉलिश करणे, कचरा आणि प्लास्टिक किंवा भंगार गोळा करणे अशी कामे करताना अनेक लहान मुले आपल्या नजरेस रोज पडत असतात. त्यावेळी आपण त्यांना काही खाद्यपदार्थ, पैसे किंवा आपल्या मुलांनी वापरलेले जुने कपडे देऊ करतो. पण आपण त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत गरजेचा विचार कधी करतो का? तर नाही. हिंदी मध्ये 'शिक्षा' म्हणजे शिक्षण आणि मराठीमध्ये 'शिक्षा' म्हणजे दंड . त्या मुलांची गरज आणि आपण केलेली मदत लक्षात घेता या दोन वेगवेगळ्या भाषेतील एकाच शब्दाच्या दोन अर्थांचे केलेले चित्रण म्हणजे हा लघुपट.
 
कलाश्री इंटरटेनमेंट' निर्मित 'शिक्षा' या लघुपटाचे दिग्दर्शन राष्ट्रपाल प्रकाश काकडे यांनी केले असून निर्मिती महेश महादेव कांबळे तर संगीत सुहास सुरेश भोसले आणि संजय शेलार तसेच  सहाय्यक छायाचित्रकार अक्षय पाटील यांनी केले आहे. या लघुपटात सार्थक वाटवे सोबतच योगिता पाखरे व संतोष सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. लघुपटाचा एकंदर विषय हा समाजातील एका अत्यंत संवेदनशील मुद्द्याला हात घालणारा असल्याने हा लघुपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी ठरेल यात शंका नाही.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

तुळजापूर, कोल्हापूर की माहूर? देवीदर्शनासाठी कोणते ठिकाण निवडाल?

शाहरुख खानला तुरुंगात जाण्याची वेळ आली, तेव्हा नाना पाटेकर यांनी केली होती मदत; जुना किस्सा पुन्हा चर्चेत!

हिवाळ्यात तुम्ही दक्षिण भारताला भेट देत असाल, तर हे साहसी उपक्रम नक्की करून पहा

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या निधनावर केलेल्या 'ईविल डेड' टिप्पणीमुळे चित्रपटसृष्टी संतप्त

होंबळे फिल्म्स 'गोंधळ' मराठी चित्रपटाला जागतिक ओळख मिळवून देणार! ऑस्कर २०२७ मध्ये प्रवेश केल्यानंतर निर्मात्यांची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments