Dharma Sangrah

'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन

मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (17:08 IST)
लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई - चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज जोशी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे.
 
 
फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शनच्या पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असून डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील भूमिका आहे. येत्या १२ ऑक्टोबरच्या मंगलमय प्रसंगी प्रदर्शित होत असलेल्या 'शुभ लग्न सावधान'ला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

हृतिक रोशनला त्याच्या 'गुड बॉय' प्रतिमेतून बाहेर पडायचे आहे, सोशल मीडियावर 'ग्रे शेड्स' असलेल्या भूमिकेच्या शोधात

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नाशिक पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक

संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी जुळ्या मुलांचे पालक झाले

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिराला भेट दिली

अनवाणी प्रवास करत अभिनेत्रीने घेतले तिरुपतीचे दर्शन

पुढील लेख
Show comments