तुला कळणार नाहीचा प्रीमियर सोहळा संपन्न
सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला, स्वप्ना जोशी वाघमारे दिग्दर्शित 'तुला कळणार नाही' या सिनेमाचा नुकताच अंधेरी येथे प्रीमियर सोहळा पार पडला. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा ८ सप्टेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून, या सिनेमाच्या स्क्रीनिंगला स्वप्नील जोशी, शरद केळकर, गणेश आचार्य, सचिन पिळगावकर, सई ताम्हणकर, सुनील पाल, अरुण नलावडे यांसारख्या मराठी तसेच हिंदीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकारांनी विशेष उपस्थिती लावली होती.