शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सयाजी आणि भाऊचा यंटम

शार्दूल फिल्म्सचे अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या निर्मितीत यंटम हा चित्रपट येत आहे. याचे दिग्दर्शक समीर आशा पाटील असून जुन्नर येथे याचे चित्रीकरण सुरू आहे.
 
सयाजी शिंदे आणि भालचंद्र कदम यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 92 नवोदित कलाकारांना यात काम करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. चित्रपटाचे लेखन समीर आणि मेहुल अघजा यांनी केले आहे. तसेच अर्जुन सोरटे सिनेमॅटोग्राफर, परेश कामदार संकलन,  कुणाल लोलसूर साऊंड डिझाइन आणि मीलन देसाई वेशभूषेची जबाबदारी निभावत आहेत.
 
समीरने सांगितले की यंटम ग्रामीण भागातील बोलीभाषेतला शब्द आहे. ही एक म्युझिकल फिल्म असून यासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांनी खूप मेहनत घेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वासही समीरने दर्शविला.