शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (17:18 IST)

IND vs NZ 1st Test: चवथ्या दिवशीचा खेळ संपला, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 280 धावांची गरज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा चौथा दिवस संपला. भारताच्या 284 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 4/1 अशी मजल मारली आहे. भारत सध्या मजबूत स्थितीत आहे आणि शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे तर न्यूझीलंडला 280 धावा करायच्या आहेत.
दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 51 धावांत त्यांनी आपले पाच विकेट गमावले. मात्र, त्यानंतर सहाव्या, सातव्या आणि आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केल्याने भारताने त्यांचा दुसरा डाव 234/7 धावांवर घोषित केला. भारताकडून श्रेयस अय्यर (65), ऋद्धिमान साहा (61*), रविचंद्रन अश्विन (32*) आणि अक्षर पटेल (28*) यांनी धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून काईल जेमिसन आणि टीम साऊदीने प्रत्येकी तीन बळी घेतले. 
भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात टॉम लॅथम आणि विल यंग यांनी न्यूझीलंडच्या डावाची सलामी दिली
भारतीय संघाने चौथ्या दिवशी जोरदार पुनरागमन केले आणि सलग तीन अर्धशतकांच्या भागीदारीच्या जोरावर 234/7 वर डाव घोषित केला. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 65 धावा केल्या तर वृद्धीमान साहा 61धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.