सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (13:59 IST)

गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, मेलमध्ये दिल्ली पोलिसांचा उल्लेख

नवी दिल्ली. पूर्व दिल्लीतील भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या मेलमध्ये दिल्ली पोलिसांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 
गौतम गंभीरला 'ISIS काश्मीर'कडून तिसऱ्यांदा धमकीचा ई-मेल आला आहे. मेलमध्ये दिल्ली पोलिसांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
 
याआधीही त्यांना त्यांच्या अधिकृत ईमेलवर दोनदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. दुसऱ्या मेलमध्ये त्याच्या निवासस्थानाच्या बाहेरील फुटेज असलेला व्हिडिओही धमकीसोबत जोडण्यात आला होता.
याप्रकरणी गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याच्या घराभोवती कडक बंदोबस्त ठेवला आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.