सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची नियुक्ती केली असून ते 2021 पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. माजी कर्णधार कपिल देव हे सीएसीचे प्रमुख आहे. या समितीत कपिल देव यांच्या व्यतिरिक्त माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. या त्रिसदस्यी समितीने रवी शास्त्री यांची निवड केली आहे.
 
टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अंतिम सहा नावं शार्टलिस्ट करण्यात आली होती. या सहा जणांना शुक्रवारी मुंबईतील बीसीसीआयच्या हेडक्वॉटरमध्ये बोलवण्यात आले होते. त्यावेळी या सर्व उमेदवारांचे प्रेझेंटेशन आणि मुलाखती या समितीच्या समोर पार पडल्या. त्यानंतर सीएसी समितीने टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.