यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान

Varun Chakraborty
नवी दिल्ली| Last Modified सोमवार, 1 मार्च 2021 (12:44 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 12 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार टी-20 मालिकेसाठी निवडलेला फिरकीपटू वरूण चक्रवतीने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. त्यामुळे तो जर फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्याला या मालिकेतून बाहेर केले जाऊ शकते. 29 वर्षीय गोलंदाज चक्रवर्ती ऑस्ट्रेलिया दौर्यातसाठीही टी-20 संघात निवडला गेला होता. मात्र, पूर्णपणे तो तंदुरूस्त नसल्याने नंतर त्याच्या जागी टी नटराजनला संघात सामील करावे लागले होते. आता पुन्हा एकदा तो इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवडण्यात आला आहे. मात्र त्याने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. याबाबत चक्रवर्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला आतापर्यंत याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. भारतीय क्रिकेट संघात निवडल्यानंतर प्रथम यो-यो टेस्ट उत्तीर्ण होणे
गरजेचे आहे. या टेस्टमध्ये खेळाडूला 8.5 मिनिटात 2 किलोमीटर धावावे लागते किंवा आपला स्कोर 17.1 असा ठेवावा लागतो. वरूण चक्रवर्ती सध्या मुंबईत आयपीएलचा संघ कोलकाता नाइट राडर्ससोबत सराव करत आहे.

वरूणने तामीळनाडूसाठी 1 प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. मात्र, तो विजय हजारे ट्रॉफीत संघाचा सदस्य नाही. तमिळनाडूच्या सिलेक्टरने वरूणविषयी सांगितले की, आम्ही त्याला टी-20 चा स्पेशालिस्ट खेळाडू मानतो. त्याच्याकडून चार किंवा पाच षटकांपेक्षा जास्त फलंदाजीची अपेक्षा ठेवली गेली नाही पाहिजे. कारण त्याच्या बोटांवर खूप दबाव असतो.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली चांगली बातमी तर ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली  चांगली बातमी तर वॉर्नरची बायको म्हणाली - ही खळबळजनक बातमी आहे
कोरोनाविरूद्धच्या लढाईत लढा देऊन भारतीयांना मदत करून आपली मने जिंकणारी कोलकाता नाइट ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की ...

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की आयपीएल 2021 चे उर्वरित सामने भारतात होणार नाहीत
आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, ...

भारतीय क्रिकेटपटूंना फक्त कोविशील्ड वैक्सीन घ्यावी, त्यामागील कारण जाणून घ्या
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2021) 14 वा सत्र अवेळी संपला. आता भारतीय खेळाडूंना पुढच्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...