रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 7 डिसेंबर 2017 (17:07 IST)

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या स्थानी

भारताचा विराट कोहलीच्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी करणारा कर्णधार कोहली 893 पाँईटसह सहाव्या क्रमांकावरुन दुस-या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराटने एकूण 610 धावा फटकावल्या. नागपूर आणि दिल्ली कसोटीत विराटने पाठोपाठ सलग दोन द्विशतके झळकावली.
 
दिल्लीतल्या फिरोझशहा कोटला मैदानावर विराटने करीयरमधील सर्वोत्तम 243 धावा केल्या. विराटला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने नववा मालिका विजय मिळवला. 2017 मध्ये कोहलीने 10 कसोटी सामन्यांमध्ये 1059 धावा फटकावल्या. त्यात पाच शतकांचा समावेश असून तीन द्विशतके आहेत. वनडे आणि टी-20मध्ये रँकिंगमध्ये कोहली फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
 
या वर्षात कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून ब्रायन लाराच्या नावावर असलेला द्विशतके झळकावण्याचा विक्रम मोडला. टेस्ट रँकिंगमध्ये 938 गुणांसह स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट 879 गुणांसह दुस-या आणि कोहलीचा सहकारी चेतेश्वर पूजारा 873 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.