रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सेंच्युरियन , मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (12:08 IST)

विराट सर्वोत्कृष्ट कर्णधार नाही : जेनिंग

कर्णधार म्हणून विराट कोहलीची वाहवा होत असताना दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रे जेनिंग यांनी कोहलीबद्दल वेगळेच मत मांडत मोलाचा सल्ला दिला आहे. 'विराट द्याप सर्वोत्कृष्ट कर्णधार होऊ शकलेला नाही', अशा शब्दांत जेनिंग यांनी विराटबाबतचे आपले निरीक्षण नोंदवले आहे. 
 
विराट ड्रेसिंग रूममध्ये दबदबा निर्माण करणारा कर्णधार असेलही, मात्र त्याला जर एखादा चांगला मार्गदर्शक लाभला तर त्याचे नेतृत्वगुण विकसित होऊ शकतात, असे जेनिंग यांचे म्हणणे आहे. जेनिंग यांनी विराटला तो अंडर 19 मध्ये खेळत असल्यापासून पाहिले आहे. त्यावेळी जेनिंग रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रक्षिक्षक होते.
 
भारतीय क्रिकेटने अशी व्यक्ती शोधायला हवी, जी विराटमधील गुणांचा विकास करायला साहाय्यभूत ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.