गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

काय भारतातील लोकं स्वीकारतील बिकिनीतील एअरहोस्टेस

प्रत्येक एअरलाइंसची एअरहोस्टेस आणि त्यांची युनिफॉर्म केवळ एअरलाइंसची ओळख नसून प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र असतं. एवढंच नव्हे तर काही एअरलाइंस त्या देशातील संस्कृतीची ओळख करवतात. परंतू काही एअरलाइंस मार्केटिंग स्टेट्रजी अंतर्गत असे ड्रेस डिझाइन करवतात की त्यांच्या प्रवाशांची संख्या वाढत जाते.
 
अशीच एक एअरलाइंस आहे बिकिनी एअरलाइंस, ज्याची सेवा भारतामध्ये सुरू होणार आहे. व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी व्हिएटजेट कंपनीची विमानसेवा लवकरच भारतात सुरू होणार आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
 
व्हिएटजेटची विमानसेवा जगभरात बिकिनी एअरलाइंस म्हणूनही ओळखली जाते कारण यात एअरहोस्टेस बिकिनीमध्ये दिसून येतात. या बोल्ड पाउलामुळे ही सेवा नेहमीच विवादात असते. मात्र त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतो.
 
दिल्ली ते व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहराला जोडणारी ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असेल. उल्लेखनीय आहे की ही विमानसेवा दुनियेत आपल्या कॅलेंडरसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लोकं व्हिएटजेटच्या सेक्सी कॅलेंडर्सची वाट बघत असतात. कंपनीप्रमाणे ही डायरेक्ट फ्लाईट्स असून यासाठी कुठलीही फ्लाईट बदलावी लागणार नाही.
 
या एअरलाइंसच्या एअरहोस्टेसचा ड्रेस कोड कंपनीच्या सीईओ Nguyen Thi Phuong Thao यांनी निवडला असून त्या व्हिएतनामची प्रथम अब्जाधीश महिला उद्यमी आहेत. अलीकडेच ही एअरलाइंस एका फुटबॉल टीमच्या स्वागतासाठी एअरहोस्टेसला लिंगरीमध्ये प्रदर्शित करण्यामुळे चर्चेत होती. 
 
आता बघायचे आहे की भारतात या सर्व प्रकारावर काय प्रतिक्रिया मिळते. कारण भारतात नेहमी संस्कृतीची जपण्याच्या नावाखाली आंदोलन, विरोध प्रदर्शन होत आले आहे. मग ते एखाद्या सेलिब्रिटींच्या मुखातून निघालेल्या वाक्यामुळे असो वा एखाद्या सिनेमाच्या माध्यमातून का नसो, कधी कुणाच्या भावना दुखावल्या जातील काही सांगता येत नाही. अशात बिकिनीमध्ये एअरहोस्टेस येऊन भारताच्या संस्कृत लोकांना सेवा देतील तर काही प्रवाशी सुखावत असले तरी काही मात्र यावर विरोध नक्कीच प्रदर्शित करतील.
 
कारण भारत वैज्ञानिक क्षेत्रात कितीही पुढे गेलं असलं तरी, सेक्स आणि एक्सपोज या प्रकरणांमध्ये सीमा अजूनही मर्यादित ठेवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. रॅपसाठी स्त्रियांचे कपडे जबाबदार असतात हा विचार ठेवणार्‍या लोकांच्या या देशात बिकिनी घालून वावरणे कितपत पटेल हे विचार करण्यासारखे आहे. येथे तर समुद्र तटावर बिकिनी घालून फिरणार्‍यांनाही येथील लोकं ट्रोल करायला सोडत नाही तर विमानात बिकिनीची काय गरज हे प्रश्न नक्कीच उद्भवतील.
 
एअर इंडिया या विमान कंपनीच्या एअरहोस्टेस आजदेखील भारताची संस्कृती दर्शवत साडी नेसून नमस्कार म्हणत प्रवाशांचे स्वागत करतात. तिथे बिकिनी घातलेल्या हवाई सुंदर्‍या कितपत दम भरतील हे बघणे मनोरंजकच किंवा विवादास्पद ठरेल असे म्हणावे लागेल.