Daily Horoscope
✕

होईल चांगलं उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे...

Updated: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (18:32 IST)
 
आम्ही हौशेने बुढीचे बाल विकत घेतला. तो हातात आल्यावर त्याचा एक लचका तोडला तोंडात विरघळत असतानाचं लहानपणीचे दिवस आठवले.
 
काचेच्या बंद पेटीतून एक माणूस विकायला यायचा. तेव्हा दहा पैशात खूप काही मिळायचं. तेव्हा अजून एक गंमत म्हणजे एका मोठ्या दांडूला खूप रंग बेरिंगी साखरेचा गुळाचा पाक असलेला प्लास्टिकच्या पुडक्याने झाकलेले असायचं. त्या माणसाला आपण आकार सांगायचं तो सायकल, स्कूटर, फॅन आणि इतर ही आकार त्यातून बनवून द्यायचा.
 
कोण गंमत यायची आणि तो कलाकार पोटा साठी हसत हसत हुबेहूब ते तयार करून घ्यायचा. ती जादू अलगच दुनियेत घेऊन जायची आम्हाला. त्याच्या भोवती घातलेला गराडा आणि आजूबाजूला आम्ही चिल्ल पिल्लं.
 
तसंच आईस फ्रूट वाला पण यायचा, 5 पैसे, 10 पैसे खूप झाले, मस्त टेस्टी असायचं, जीभ लालचुटुक व्हायची, कुणाची नारंगी एकमेकांना जीभ दाखवायचो.
आज ice-कँडी मिळते, आमच्या वेळे सारखं ते लागतही नाही आणि ती चवपण नसते.
 
सहज विचार येतो की खरंच हे अगदी छोटा व्यवसाय करणारे, बिचारे ज्याचं दुकान म्हणजे त्यांची सायकल आणि ते घेऊन दारोदार भटकत फिरतात बिचारे. अस कितीसा कमावतं असणार? रोजचा त्यांच्या परिवार चालवण्यासाठी जो खर्च लागतो तो तरी निघतो की नाही ह्यातून?
 
कार्यालयाबाहेर सायकल वर फुगे घेऊन असतात, किती फुगे विकले जात असतील त्यांचे, कोण घेत असेल ? असे नानाविध प्रश्न मला पडतात.
 
पण अशा ह्या लोकांना पाहिलं की वाटतं की हे लोकं हिंमत न हरता, भांडवल नसताना, जागा नसताना आपलं व आपल्या परिवाराचं पोट भरू शकतात तर मग आपण किंवा आपल्या मुलांनी हिंमत न हरता आशा कठीण काळातही हिंमत ठेवून काम शोधायला हवं, धंदा उभा करायला हवा! तेव्हाच तर सगळं सुरळीत होईल न !
म्हणतात न की, "हिम्मते मर्दा तो मदद दे खुदा"! उठा उठा हरून बसू नका ...होईल चांगलं उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे. 
........अश्विनी थत्ते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नाशिक कुंभमेळा स्थळाजवळील भूजलात कर्करोगाशी संबंधित विषारी रसायन आढळले! १५ औद्योगिक युनिट्स बंद करण्याची नोटिस

LIVE: नाशिक कुंभमेळा स्थळाजवळील भूजलात कर्करोगाशी संबंधित विषारी रसायन आढळले

ठिबक सिंचनातून पाण्याची बचत कशी कराल? लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन

५ जबरदस्त AI+ फीचर्स असलेल्या फोन्सवर प्रचंड सूट! सर्वात स्वस्त फोन फक्त ₹९,७९९ मध्ये; पाहा संपूर्ण लिस्ट

शिंदे सेनेविरोधातील बंड महागात पडले, भाजपने चार नेत्यांना पक्षातून काढून टाकले

पुढील लेख
Show comments