बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

बकर्‍या पगारी कामगार

जगातले नंबर वन सर्च इंजिन गुगलमध्ये माणसे आणि मशीन्स काम करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र येथे 200 बकर्‍या पगारी कामगार आहेत याची माहिती अनेकांना नसेल. या बकर्‍या दररोज कामावर येतात आणि त्या बदल्यात त्यांना जेवण आणि पगार दिला जातो.
 
या बकर्‍यांचे काम म्हणजे गुगल कार्यालयातील विशाल लॉनवर हिंडणे आणि तेथे असलेले लुसलुशीत गवत दिवसभर चरत राहणे हे आहे. या कामामुळे बकर्‍यांचे पोट भरते आणि कंपनीचा लॉन कापरण्याचा खर्च वाचतो. शिवाय लॉन कापायच्या मशीनचा आवाज व धूर यामुळे कर्मचार्‍यांना होणारा त्रासही होत नाही.
 
बकर्‍यांना चरविण्यासाठी येथे प्रशिक्षित मेंढपाळही ठेवले गेले आहेत. अर्थात या कामासाठी बकर्‍यांना कामावार ठेवणारी गुगल ही पहिली कंपनी मात्र नाही. यापूर्वी याहूने 2000 साली असेच त्यांच्या कंपनी आवारातील लॉन मेंटन करण्यासाठी बकर्‍या तैनात केल्या होत्या.