बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated: रविवार, 11 सप्टेंबर 2022 (13:51 IST)

Grandparents Day आपल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!

family
नातवंड म्हणजे चीज असतं सँडविचमधलं 
आजी आजोबा यांच्यामध्ये दडलेलं 
नातवंड म्हणजे काय चीज असते
आई रागावली की आजीकडे धाव घेते.....
नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा
पाळण्यातून अलगद काढून घ्यावा...
नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.
नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद
सगळ्या चवींना बांधतो एकसंध...
नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
अखंड आनंद घ्या हवा तेवढा...
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम...
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग...
आपल्या सर्व आजी-आजोबांना समर्पित!!