Festival Posters

मिशन काश्मिर २०१९

Updated: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (17:18 IST)
 
सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमुळे पाकीस्तानलाही कळून चुकलं होतं की आता खरोखर सरकार बदललंय... हे पुचाट आणि नेभळट कॉंग्रेस सरकार नाही. तर हे निर्णयक्षम व छत्रपती शिवरायांच्या तत्वावर चालणारे भाजपा सरकार आहे आणि या सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे संस्कार झालेले आहेत. अनेक फुटिरतावादी लोक संघाला अतिरेकी संघटना म्हणत असताना मात्र संघाने भारतात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली... आज त्याचे परिणाम आपल्याला समोर दिसत आहेत. मोदी सरकारने फुटिरतावादी नेत्यांचा चांगलाच बंदोबस्त केला. हुर्रियत नावाची दळभद्री जमात त्यांनी जवळ जवळ संपवलेली आहे. आज काश्मिरात हुर्रियत असा उच्चार होताना दिसत नाही. ज्यावेली सर्जिकल स्ट्राईक झालं त्यावेळी अनेकांनी सरकारची मस्करी केली. शरद पवारांपासून अनेक नेत्यांनी आमच्यावेलीही सर्जिकल स्ट्राईक झाली होती पण आम्ही गाजावाजा केला नाही असं म्हटलं. ह्यांना सर्जिकल स्ट्राईक म्हणजे भ्रष्टाचार करण्याइतकं सोपं वाटतं. असो. एअर स्ट्राईकच्या वेळीही सरकारची खिल्ली उडवण्यात आली. एअर स्ट्राईक बनाव आहे, किती अतिरेकी मेले. राज ठाकरे नावाच्या नेत्याने तर बाळासाहेबांचं नाव मातीत मिळवलं असं म्हणायला हरकत नसावी इतकं विकृत आणि वाह्यात स्टेटमेंट दिलं. म्हणे पुलवामा हा मोदींचा डाव होता, डोवालांची चौकशी झाली पाहिजे. ह्यांचे गोडवे पाकीस्तानात गायले गेले. पण हे मात्र भारतीय जनतेच्या मनातून पार उतरुन गेले. आता बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अशाप्रकारे सर्व ममता बॅनर्जी वगैरे नेत्यांची भेट घेऊन ईव्हीएमच्या नावाने बोटं मोडत फिरत आहेत. पण त्यांच्या रक्तात ठाकरेंचं रक्त वाहतंय म्हणून एक मराठी माणूस म्हणून आणि आदरणीय बाळासाहेबांचे संस्कार महाराष्ट्रावर व त्यांच्यावर झालेत म्हणून मी त्यांना आवाहन करतो की एकदा मोदीद्वेषाचा चष्मा डोळ्यांसमोरुन काढून नीट परिस्थिती पाहा. भारतीय जनतेने स्वेच्छेने निवडून दिलेलं हे सरकार आहे. आजपर्यंत आएल्या कोणत्याही सरकारवर जनतेने इतकं प्रेम केलेलं नाही किंवा विश्वासही दाखवलेला नाही...
 
आज काश्मिरमधून ३७० आणि ३५ ए कलम काढून टाकण्यात आलं. हे दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्याला लाभलेला स्वायत्त राज्याचा दर्जा संपुष्टात येणार आहे. या बरोबरच जम्मू आणि काश्मीरमध्ये संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणूक करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. याशिवाय राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे. अमित शहा यांनी संसदेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयकही मांडले. यापैकी जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकामध्ये काश्मीरचे लडाख आणि उर्वरित काश्मीर असे दोन भाग करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यापैकी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असेल. तर लडाखमध्ये विधानसभा नसेल. ही घटना भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहून ठेवली जाईल... तात्याराव सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर हे भारतीय इतिहासाचं सातवं सोनेरी पान आहे. आज भारत पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. जे पाप गांधी-नेहरुंनी करुन ठेवलं त्या पापातून आज भारतीयांना मुक्ती मिळाली... अखंड भारतही जास्त दूर नाही. होय अखंड भारत... अनेकांना ३७० कलम रद्द होणं हे सुद्धा अशक्य वाटत होतं. अर्थात अखंड भारत आजच्या घडीला सोपं नाही. पण येणार्‍या काळात हे शक्य आहे. शेषराव मोरेंचे भक्त आणि डावे लोक अखंड भारताची मस्करी करतात. कसं करणार कसं करणार हे विचारतात. त्यांना मी इतकंच सांगेन जसं त्रिपल तलाक आणि ३७० जसं केलं तसंच करणार. पण तो काळ अजून दूर आहे. त्याला अजून किमान २५ ते ३० वर्षे लागतील. २५-३० वर्षे फार मोठा काळ नाही. सुरुवातीला बलुचीस्थान टार्गेट असेल, नंतर पाकीस्तानचे असंख्य तुकडे पडणे हे टार्गेट असेल त्यानंतर अखंड भारत शक्य आहे. लक्षात ठेवा माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री श्री. अमित शह हे दोघंही संघाचे स्वयंसेवक होते. संघामध्ये १४ ऑगस्टला अखंड भारतासाठी संकल्प घेतला जातो. मोदी आणि शहा दोघंही साधारण बालपणापासून वा किशोरवयापासून संघात होते. म्हणजेच त्यांनी अनेक वेळा अखंड भारतासाठी संकल्प घेतलेला आहे. ते संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर जो त्यांच्या जागेवर बसेल तोही याच संस्कारातला असेल याची ते काळजी घेतील. म्हणून मी म्हणतोय की अखंड भारत सध्या जरी कठीण वा दूर असला तरी येणार्‍या काळात अखंड भारत शक्य आहे... होय, सिंधू नदी मुक्त होऊ शकते. आपल्याला काय करायचंय तर केवळ देवापुढे हात जोडून प्रार्थना करायचीय आणि या सरकराल बळ मिळेल अशा बहुसंख्य मतांनी पुन्हा पुन्हा निवडून द्यायचंय... दोस्तांनो, जहां हुए बलिदान मुखर्जी वह काश्मिर हमारा है... यह महर्षी कश्यप का काश्मिर है... यह भारतीयोंका काश्मिर हैं... त्या पुढे जाऊन घोष करायचा आहे की एक धक्का और दो, पाकीस्तान तोड दो... 
 
माझ्या तमाम भारतीय भगिनी आणि बंधुंनो, आज देवापुढे एखादा गोड पदार्थ ठेवून नैवेद्य जरुर दाखवा... हिंदू नैवेद्य दाखवतील, ख्रिस्ती बंधू येसूसमोर प्रार्थना करतील, मुस्लिम बांधव नमाज पढतील... प्रत्येक जण आपापल्या उपासना पद्धतीनुसार देवासमोर नस्तमस्तक होतील. पण आपलं ध्येय मात्र एकच आहे बंधूंनो... एक असा बलवान, महान भारत... जो विश्वावर राज्य करेल, ज्याच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची अमेरिका वा चीन सारख्या बलाढ्य राष्ट्रांचीही हिंमत होणार नाही. भारत सर्वच क्षेत्रात अव्वल राहिल... वसुधैव कुटुंबकम हेच आपले मूळ ध्येय आहे...
 
हर हर महादेव... भारत माता की जय... वंदे मातरम...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

"ही माझी शेवटची भेट असू शकते": मुंबई मोर्चापूर्वी मनोज जरांगे भावूक; ते आपल्या आवाहनात म्हणाले...

चहापासून ते किराणा मालापर्यंत... आता 2,000 पर्यंतचे UPI पेमेंट विनाशुल्क होणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

सरकार महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी संहिता (UCC) आणण्याच्या तयारीत!

LIVE: हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी पावसाचा इशारा जारी केला

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

पुढील लेख
Show comments