सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (15:07 IST)

चित्रकार मुकेश शर्मा यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन दि. ९ ते १५ ऑक्टोबर मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत

mukesh sharma
राजस्थान उदयपूर येथील प्रसिद्ध चित्रकार मुकेश भंवरलाल शर्मा यांनी साकारलेल्या मेवाड (राजस्थान) च्या पिछवाई कलेचा पारंपारिक भारतीय चित्रांचे प्रदर्शन मुंबईत काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. ९ ते १५ ऑक्टोबर, २०२३ हया दरम्यान ११ ते ७ हया वेळेत कलाप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री राजेंद्र पाटील (द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, इंडिया आर्ट फेस्टिव्हल आणि इंडियन कंटेम्पररी आर्ट जर्नलचे संपादक) यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी कला व उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
 
मेवाड (राजस्थान) येथील पिछवाई ही पारंपारिक कला सर्वात लोकप्रिय आहे. राजस्थान प्रसिद्ध चित्रकार बी. जी. शर्मा यांनी ही पारंपारिक कला ५० वर्षापासून अधिक काळ जतन करून ठेवली आहे. त्यांचे सुपुत्र तसेच राजस्थान राज्य सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्कारप्राप्त चित्रकार मुकेश शर्मा यांनी या कलेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. बी. जी स्टुडिओमध्ये त्यांच्या चित्रांचा संग्रह आहे.
mohan sharma
पिछवाई नाथद्वारा शैलीची उप-शैली (मेवाड चित्रकला शाळा) ही एक पारंपारिक कला आहे ज्यामध्ये चित्रकला सुती कापडावर बनविली जाते. विषय प्रामुख्याने श्रीनाथजी (श्रीकृष्णाचे बालस्वरूप) आणि कृष्णलीला जसे राधा-कृष्ण झुला, गायीसह राधाकृष्ण, कृष्ण आणि गोपी, गीता उपदेश, गौ प्रेम इत्यादींवर केंद्रित आहेत, श्री शर्मा यांच्या शैलीचे आणखी एक वेधक वैशिष्ट्य आहे. अर्ध मौल्यवान दगडांमधून काढलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर, वास्तविक सोने आणि चांदीचा वापर ज्यामुळे ही चित्रे दीर्घकाळ टिकणारी, अधिक आकर्षक बनतात. पिछवाई कलेचा उत्कृष्ट नमुना पाहण्याची सुवर्णसंधी रसिकांना चालून आली आहे. हे प्रदर्शन १५ ऑक्टोबरपर्यंत ११ ते ७ या वेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येईल.