Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका : 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृतीदिन 2023

Updated: गुरूवार, 9 मार्च 2023 (15:13 IST)
 
सावित्रीबाईंचे स्वप्न शिक्षित व्हायचे होते, पण त्याकाळी दलितांबद्दल भेदभाव खूप होता. एके दिवशी सावित्रीबाईंनी हातात इंग्रजी पुस्तक घेतले होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी ते पुस्तक पाहिले आणि ते फेकून दिले. यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगितले की केवळ उच्चवर्णीय पुरुषच शिक्षण घेऊ शकतात. दलित आणि महिलांना शिक्षण घेऊ दिले जात नाही, कारण त्यांच्यासाठी शिक्षण घेणे पाप आहे. यानंतर सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पुस्तक परत आणले. काहीही झाले तरी शिक्षण नक्की घेईन, अशी शपथ त्यांनी घेतली.
 
सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रात 3 जानेवारी 1831 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते.
 
सावित्रीबाई फुले स्मृतीदिन हा दिवस भारतातील महिलांसाठी आणि विशेषतः दलित, ओबीसी, आदिवासी समाजातील महिला, मुस्लिम महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने शूद्रातिशूद्र मुलींसाठी शाळा उघडल्या आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी संघर्ष केला. सावित्रीबाई जेव्हा त्यांच्या शाळेत शिकवायला जात असत तेव्हा त्या काळातील सुसंस्कृत लोक त्यांच्यावर शेण, माती, दगड आणि घाण टाकत असत. त्यांना रस्त्यांवर व चौकाचौकात अडवून धमकावायचे.
 
जेव्हा मुलींना शिक्षण देणे वाईट मानले जात होते, तेव्हा सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडली. 1848 साली त्यांनी महाराष्ट्रातील पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. यानंतर त्यांनी मुलींसाठी एक-दोन नव्हे तर 18 शाळा बांधल्या.
 
सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणासाठीच लढा दिला नाही, तर त्यांनी देशातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अस्पृश्यता, बालविवाह, सती प्रथा, विधवा पुनर्विवाहाला बंदी यासारख्या वाईट गोष्टींना तिने विरोध केला आणि त्याविरुद्ध लढा चालू ठेवला. त्यांनी आयुष्यभर महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला.
 
ज्या समाजाने सावित्रीबाई फुलेंना विरोध केला त्यांच्या समाजातील एका मुलीचे प्राण त्यांनी वाचवले. काशीबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आत्महत्या करणार होती. काशीबाई गरोदर होती आणि लोकांच्या रोषाला घाबरून ती आत्महत्या करणार होती, पण सावित्रीबाईंनी तिला हे भयानक पाऊल उचलण्यापासून रोखले. त्या काशीबाईला घरी घेऊन आल्या आणि प्रसूती झाली. त्यांनी काशीबाईच्या मुलाचे नाव यशवंत ठेवले आणि त्याला आपला दत्तक मुलगा बनवले. सावित्रीबाईंनी यशवंतांना शिक्षण देऊन डॉक्टर बनवले.
 
ज्या वेळी भारतात जातिव्यवस्था आपल्या शिखरावर होती, सावित्रीबाई फुले यांनी आंतरजातीय विवाहांना चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली. सावित्रीबाईंनी पतीसह 'सत्यशोधक समाज' स्थापित केले. येथे पुजारी आणि हुंडा याविना लग्न लावले जात असे. 
 
सावित्रीबाई फुले या लेखिका आणि कवयित्री सुद्धा होत्या. त्यांनी 1854 मध्ये काव्यफुले आणि 1892 मध्ये बावनकाशी सुबोध रत्नाकर प्रकाशित केले आणि "जा, शिक्षण मिळवा" नावाची कविता देखील प्रकाशित केली. सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके काव्यफुले (काव्यसंग्रह), सावित्रीबाईंची गाणी, सुबोध रत्नाकर, बावनकशी, जोतिबांची भाषणे.
 
सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू
1897 मध्ये पुण्यात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत फुले यांनी नालासोपारा परिसरात रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले. क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात संसर्गमुक्त ठिकाणी करण्यात आली. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. यात सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पत्नीने पतीला जिवंत पुरण्याच्या उद्देशाने घरातच कबर बांधली; कामगारांना संशय आल्याने बारामतीत मोठा कट उघडकीस

World Lion Day 2026: जागतिक सिंह दिनाचा इतिहास, सिंहा संबंधित तथ्य जाणून घ्या

LIVE: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धीम्या तयारीवर संतांनी नाराजी व्यक्त केली

गिरीश महाजन यांच्यावर विश्वास नाही! मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वतः देखरेख करावी, कुंभमेळ्याच्या तयारीवर संतांची नाराजी

आधी सुरक्षारक्षकाची हत्या, मग व्यावसायिक कुटुंबाला लक्ष्य…जुहूमध्ये भीषण कटाचा पर्दाफाश; पाच आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments