suvichar

ताई म्हणजे आपली बहीण

Updated: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (12:16 IST)
मोठे होतं होतं हे नातं कधी गुरफटून जातं हे समजत ही नाही.ताई शिवाय पान हलत नाही,काही खावंसं वाटत नाही.
तिच्या पावलावर पाऊल टाकावं वाटतं.
भांडण पण होतात खूप!तिला चांगलं दिलं, मला नाही म्हणत रुसवे फुगवे होतात, लुटुपुटू च्या लढाया होतात !
लहान बहीण असो बाकी भाऊ हे सर्वच घरी ह्या न त्या फरकाने घडतच.
मोठं झाल्या वर कपडे न विचारता घालून मिरविणे, सायकल तोडून ठेवणे, असे ना ना प्रकार घडतात, पण त्याचे पडसाद काही फार काळ टिकून राहत नाही.
बहिणी बहिणीच्या प्रेमात दिवसेंदिवस वाढ होते, गुपितं सांभाळून ठेवले जातात !अशी ही भावनिक गुंतागुंत लीलया सांभाळली जाते.
पण बहिणीच्या लग्नानंतर आपण एकटं पडतो, काहीतरी हरविल्या सारख होतं.
पण तिच्या घरी आवर्जून राहायला जावंसं वाटतं, आईनं दिलेलं जिन्नस, वस्तू आवडीने घेऊन जविशी वाटतात!
आपलं ही लग्न झालं की मात्र तिच्या असण्याची किंमत जरा जास्तच वाटते.आपला भरभक्कम आधार वाटते.सर्व अडचणींवर मिळालेलं उत्तर वाटते आपली बहीण.
तर ही अशी बहीण सर्वच टप्प्यावर आपलं हक्काचं माणूस मात्र असतं, आणि आईनन्तर च आपलं माहेर ही तीच असतं ह्यात शंका नाही!!!! 
........एक बहीण अश्विनी थत्ते

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

ऑटोचालकांना दिलासा मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक निवेदन सादर केले

ट्रम्प यांनी कॅनडाला १ जानेवारीपासून कॅनेडियन कार, ट्रक, ऑटो पार्ट्स आणि स्टीलवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची धमकी दिली

IND vs AUS Hockey: भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीतील स्थान गमावले, सामना बरोबरीत संपला

दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये ईस्ट झोनची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल

रेड-यलो संघाने ड्युरँड कपच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागानचा ४-१ असा धुव्वा उडवला

पुढील लेख
Show comments