deepawali
✕

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

Updated: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:23 IST)
 
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
 
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
 
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
 
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
 
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा
 
गीतकार : कुसुमाग्रज

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र नीट प्रवेश: ६ फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा: पुढील २० वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ नाही; गणेश नाईकांची घोषणा

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांशिवाय राष्ट्रवादीच्या ६ दिग्गज नेत्यांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

मुंबईतील CNG दरवाढीचा तुमच्या प्रवासाच्या खर्चावर किती परिणाम?

७ फेरे, जन्मोजन्माची साथ, पण सुहागरातआधीच नवरी-नवरदेव थेट पोहोचले रुग्णालयात! नक्की काय घडलं?

पुढील लेख
Show comments