मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (10:08 IST)

BHEL recruitment 2021 : दहावी उत्तीर्णांना संधी

BHEL मध्ये अप्रेंटिसच्या पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योग्यतेनुसार थेट भरती केले जाणार आहे. 

भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरु असून या सरकारी नोकरीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. बीएचईएलने या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. 
 
पदांची माहिती
आयटीआय ट्रेड अप्रेंटिससाठी पदांची एकूण संख्या - ३००
इलेक्ट्रीशियन - ८० पदे
फिटर - ८० पदे
वेल्डर - २० पदे
टर्नर - २० पदे
मशीनिस्ट - ३० पदे
ड्राफ्ट्समन (मेकॅनिक) - ५ पदे
इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) - ५ पदे
COPA / PASAA - ३० पदे
कारपेंटर - ५ पदे
प्लंबर - ५ पदे
मेकॅनिक मोटर व्हीकल - ५ पदे
मशीनिस्ट (ग्राइंडर) - ५ पदे
गवंडी (MES) - ५ पदे
पेंटर - ५ पदे
 
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून ITI डिप्लोमा कोर्स.
 
वयोमर्यादा
१८ - २७ वर्षे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
 
या प्रकारे करा अर्ज 
ITI Trade Apprentice पदांसाठी अर्ज करण्यासाठी NAPS Portal वर नोंदणी करावी लागेल. 
नोंदणी करताच एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. 
या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने BHEL Bhopal च्या वेबसाइट वर जाऊन नोंदणी करा. 
 
NAPS Portal वर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
BHEL मध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 
BHEL Apprentice Notification 2021 साठी येथे क्लिक करा.