शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (12:25 IST)

CABS DRDO Recruitment 2021: जूनियर रिसर्च फेलोशिपच्या 20 पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा हे जाणून घ्या

CABS DRDO Recruitment 2021: सेंटर फॉर एयरबोर्न सिस्टम्स (CABS) बेंगळुरू-डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF) च्या 20 पदांसाठी आवेदन काढले आहे. डीआरडीओ (DRDO) मध्ये नोकरी करण्यास इच्छुक तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. इच्छुक व योग्य उमेदवार या पदांसाठी DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे.
 
बेंगळुरू-डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम श्रेणी असलेले आणि वैध GATE स्कोअर कार्ड असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
 
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, सी-डॅकने प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी आणि इतर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अंतिम तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, सी-डॅकने एकूण 259 पदांसाठी रिक्त जागा मागवल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार cdac.in वर CDAC च्या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.