शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:16 IST)

MPSCकडून मुलाखतीनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर; भरली अतिविशेषीकृत पदे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पडल्या, त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकालदेखील प्रसिद्ध केले आहेत. ही अतिविशेषीकृत पदे आयोगाने विशेष मोहीम राबवून भरली आहेत.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मज्जातंतूशास्त्र  नवजात शिशुरोगशास्त्र, अंतस्त्रावी विकारशास्त्र, जठारांत्रजन्यशास्त्र, वृक्क विकारशास्त्र, हृदयवाहिका आणि उरोविकृती शल्यचिकित्साशास्त्र बालरोग शल्यचिकित्साशास्त्र, मूत्रविकारशास्त्र, सुघटन शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग चिकित्साशास्त्र, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपसंचालक  आरोग्य सेवा, औषध वैद्यकशास्त्र , मज्जातंतू शल्यचिकित्साशास्त्र  अतिविशेषीकृत  विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा एकूण 34 पदांच्या मुलाखती आयोगाने घेतल्या असून या पदांच्या मुलाखती ज्या दिवशी पार पडल्या त्याच दिवशी आयोगाने संबंधित पदाचे निकालदेखील प्रसिद्ध केले आहेत.