बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (12:46 IST)

दहावी पाससाठी रेल्वेत महाभरती

रेल्वे परीक्षा घेतली जाणार नाही 
विभागातील चार हजारांपेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्यास अद्यापही संधी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने एकूण 4 हजार 103 पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत. इच्छुकांना 8 डिसेंबरर्पंत अर्ज करता येणार आहेत.
 
या भरतीप्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसाठी आरक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.
 
रेल्वेकडून 'अप्रेंटिस' पदाच्या एकूण 4 हजार 103 पदांची भरती केली जात आहे. यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व आटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराचे किमान वय 15 असावे, तसेच 8 डिसेंबर 2019 रोजी तो 24 वर्षांचा नसावा. कमाल वयोमर्यादेत एससी/ एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची तर ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
 
इयत्ता दहावीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क आहे. अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी उमेदवारांनी http: //104.211.221.149/instructions.php संकेतस्थळाला भेट द्यावी.