शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (15:25 IST)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने “इतक्या” पदांसाठी बंपर भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने (SBI) बंपर भरती करण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एसबीआय च्या वतीने 1400 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
 
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1400 हून अधिक CBO पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठीच्या 1422 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत.
 
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून CBO भरती अंतर्गत एकूण 1422 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यापैकी 1400 पदे नियमित, तर 22 पदे बॅकलॉगमधील आहेत. एकूण 1422 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
 
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज कारावा लागेल. या पदांवरील निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. यासाठीची लेखी परीक्षा 4 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
 
एसबीआय CBO रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे.
 
शैक्षणिक पात्रता अशी असावी 
एसबीआय CBO भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी शिक्षण पूर्ण केलेली असावी. याशिवाय इंटीग्रेडेट ड्यूल डिग्री आणि चार्टर्ड अकाउंटंट, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कॉस्ट अकाउंटंट उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
 
अर्जाची फी अशी
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, जनरल / EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना शुल्कामधून सवलत दिली जाणार आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor