गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : गुरूवार, 9 मे 2024 (08:54 IST)

Wooden Accessories मुलींची पसंत : लाकडी दागिने

wooden armament
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क दागिन्यांसाठीही होऊ लागला. या लाकडी दागिन्यांना तरुण मुलींचीही चांगली पसंती मिळतेय.

लाकडांपासून बनवलेल्या बांगड्या, कानातील, नेकलेस या गोष्टींचा यात समावेश आहे. मोठे, चपटे, गोल, त्रिकोणी आकारातील नेकपीस, बांगड्या, रंगीबेरंगी- लांबलचक माळा, ब्रेसलेट, कानातील कोणत्याही शेड्‌सवर शोभून दिसतात.
 
विविध रंगांच्या लाकडी बांगड्या हातभर घालणारी एखादी महिला भलताच भाव खाऊन जाते. हे दागिने साधे आणि वेगळेसुध्दा वाटतात. कॉलेजपासून, समारंभातून, ऑफिसर्पंत कुठेही शोभतात. लाकडाचे हे दागिने मॅट तसेच ग्लॉस प्रकारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही परवडणसारखी असल्यामुळे दुधात साखरच! दागिन्यांशिवाय लाकडी बेल्ट्‌सनाही तरुणींची पसंती मिळत आहे. स्कर्ट-फ्रॉक आणि जीन्सवरही हे बेल्ट वेगळा लूक देतात.
 
वजनाला हलके, कुठल्याही अॅजलर्जीची भीती नाही यामुळेया दागिन्यांना खास पसंती आहे. विशेषतः पारंपरिक कपड्यांवर हे दागिने शोभून दिसतात. निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्यासह वेगवेगळ्या रंगांच्या मिक्स कॉम्बिनेशन्समध्येही उपलब्ध आहेत. अॅगक्सेसरिजचा हा वेगळा प्रकार वापरताना चप्पल, बॅग आणि कपड्याच रंगाचा अंदाज घेऊन त्याला साजेशा रंगाच्या ज्वेलरीची निवड करता येईल.
 
बांगड्या-लाकडी दागिन्यांवर वेगवेगळ्या रंगांचं पॉलिश करण्यात येतं. विशेषतः यामधल्या रंगीबेरंगी बांगड्या प्रथमदर्शनी काचेच्या असल्यासारख्या भासतात. लाकडी बांगड्यांचा हा पर्याय मस्त आणि ट्रेंडी आहे. पारंपरिक भारतीय नक्षीकाम आणि मण्यांची सजावट केलेल्या बांगड्यांचा सेट कुठल्याही कपड्यांवर उठून दिसतो. चौकोनी, षट्‌कोनी, अष्टकोनी अशा निरनिराळ्या आकार आणि डिझाइन्समधल्या बांगड्या कुठल्याही रंगाची साडी, कुर्ता किंवा अगदी ऑफिसवेअर कपड्यांवरही तितक्याच शोभून  दिसतात. त्यामुळेच कॉलेज तरुणींबरोबरच इतर वयोगटातल्या महिलांही त्यांचा वापर करताना दिसतात. या लाकडी बांगड्या 25 ते 150 रुपयांपर्यंत मिळतात. त्यावरचं डिझाईन आणि नक्षीकाम यावर त्यांची किंमत अवलंबून असते.
 
ब्रेसलेट आणि नेकलेस लाकडाचा वापर करून बनवलेले ब्रेसलेट्‌सही बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात. यासोबतच लाकडी नेकलेस घालणचा ट्रेंडही कॉलेज तरुणींमध्ये दिसून येतोय. प्रामख्याने हे नेक पीस कुर्ता किंवा साडीला आणखीन क्लासिक लूक देतात. यामध्ये विशेषतः एकरंगी लाकडी मणी तसेच लांबट चौकोनी किंवा लांबट गोलाकार, त्रिकोणी चकत्यांचा  वापर केला जातो. हे नेकलेस शक्यतो ब्राऊन किंवा काळसर रंगात असल्याने ते कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर शोभून दिसतात. तसेच टीशर्टवर लाकडी नेकलेसऐवजी चेनमध्ये एखाद्या रंगीत पेंडन्टचा वापर करू शकता.