1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 24 डिसेंबर 2022 (09:01 IST)

काय सांगता, क्रिस्टल बॉल बदलू शकतं तुमचं नशीब

बऱ्याच वेळा आपण लोकांच्या घरात चकचकीत दगड बघितले असणार. त्यांना बघून आपल्याला असे वाटते की हे दगड घराच्या सजावटीसाठी असतात. होय, हे खरे आहे की लोक आपल्या घराच्या सजावटीसाठीच हे क्रिस्टल बॉल्स आपल्या घरात लावतात. पण त्यांना हे माहीत नसतं की या क्रिस्टल बॉल्सच्या साहाय्याने कश्या प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आपल्या घराच्या निर्धनतेला आनंदाच्या रूपात बदलू शकतो.
 
होय, वास्तुशास्त्रातील क्रिस्टल बॉल्सला घेऊन बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत. अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला सांगत आहोत अशा काही गोष्टी, ज्यांच्या मदतीने आपल्याला इच्छित फळ मिळू शकेल. 
 
आपल्याला सांगत आहोत, की वास्तुचे नियम सूर्याच्या किरणांवर आधारित असतात आणि हे क्रिस्टल बॉल्स सूर्याच्या किरणांना नियंत्रित करण्याची क्षमता ठेवतात. अशा परिस्थितीत आपल्या आयुष्यात क्रिस्टल बॉल्स किती उपयुक्त ठरतात हे सहजपणे समजू शकता. 
 
जेव्हा कधी आपण हे क्रिस्टल बॉल्स खरेदी करून आणाल तेव्हा हे लक्षात ठेवा की हे बॉल्स सक्रिय करावे लागतात. त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे -
 
* सर्वप्रथम क्रिस्टल बॉल्स एका काचेच्या ग्लासात मीठाच्या पाण्यात एक आठवड्यासाठी घालून ठेवायचे. त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने क्रिस्टल बॉल्सला स्वच्छ करून किमान 2 ते 3 तास सूर्य प्रकाशात ठेवावं. असं केल्यानं क्रिस्टल बॉल आपल्या जुन्या लहरींपासून मुक्त होऊन ताजे होऊन आपल्याला नवी ऊर्जा देण्यासाठी तयार होतात.
 
* आपल्या मतानुसार आपण क्रिस्टल बॉल आपल्या घराच्या प्रवेश दारावर देखील लटकवू शकता, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येतं नाही. 
 
* या शिवाय आपण हे क्रिस्टल बॉल्स मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत देखील लावू शकता. या मुळे खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतात आणि मुलं देखील एकाग्रचित्ताने अभ्यास करतात.
 
* क्रिस्टल बॉल्सचा वापर शयनकक्षात देखील करू शकता. वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल बॉल्स शयनकक्षात लावल्यानं पती-पत्नी मधील होणारे मतभेद नाहीसे होतात. वाद मिटतात आणि आपसातील प्रेम वाढतं.
 
* अशा प्रकारे, जर आपण बैठक कक्षात क्रिस्टल बॉल्स लावत असाल तर अशा दिशेला लावावे, जिथून त्याच्यावर सूर्यप्रकाश थेट पडतो, असे केल्यानं घरातील कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर संबंध चांगले होतात आणि अशा प्रकारे एकमेकां बद्दलची नाराजी देखील कमी होते.
 
* लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की जर आपल्या बैठकीच्या खोलीत सूर्यप्रकाश येतं नसेल तर आपण क्रिस्टल बॉल ला सक्रिय होण्यासाठी 2 ते 3 तास उन्हात ठेवू शकता.
 
* आपण आपल्या व्यवसायात वाढ होण्यासाठी देखील या क्रिस्टल बॉल्सचा वापर करू शकता. या साठी आपण या बॉल्सला ऑफिसच्या प्रवेश दारावर लावावे, जेणे करून आपल्या ऑफिसात असणारी नकारात्मक ऊर्जा हे शोषून काढेल.
 
* या व्यतिरिक्त आपण क्रिस्टल बॉल्स ऑफिस किंवा फॅक्टरीच्या उत्तर-पश्चिम दिशेला लटकवू शकता. या मुळे व्यवसायातील होणाऱ्या तोट्याला कमी करता येऊ शकत.
 
* फॅक्टरी मध्ये क्रिस्टल बॉल लावल्यानं आपल्या फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या ऊर्जेची पातळी वाढते आणि ते अधिक मन आणि परिश्रम लावून काम करतात.