Dharma Sangrah
✕

ज्येष्ठा गौरी 2023 संपूर्ण माहिती

Updated: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (08:51 IST)
 
गौरी पूजन दुसरा दिवस
दुसर्‍या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं. या दिवशी पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
 
गौरी विसर्जन तिसरा दिवस
तिसर्‍या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात. गौरी पूजन करुन आरती करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
 
दोरकाची पूजा
तिसर्‍या दिवशी काही भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या सोळा गाठी देऊन पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून दोरा घरातील सुना-मुलींच्या गळ्यात बांधतात. अश्विन वद्य अष्टमीची गळ्यावरून काढून पूजा केली जाते. ही दोरी महालक्ष्मी असल्याचे समजले जाते.
 
ज्येष्ठा गौरी आरती Jyeshtha Gauri Aarti
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा ||१||
 
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
 
ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
 
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
 
उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
 
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।

ज्येष्ठा गौरी कथा Jyeshtha Gauri Katha Marathi

सर्व पहा

Navratri 2026 : नवरात्रीचा उपवास करताना दिवसभर थकवा येऊ नये म्हणून आहारात काय घ्यावे

नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुलांना सांगता येतील अशा देवीच्या ९ प्रेरणादायी कथा

६ किंवा ७ ऑक्टोबर, पितृपक्षातील पहिली एकादशी कधी आहे? तारखेबद्दलचा संभ्रम दूर करा

Navratri 2026: नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी, कोणत्या दिवशी कोणता रंग आहे पहा

उपवासात काय खावे आणि काय टाळावे? फराळाच्या पदार्थांबाबत महत्त्वाच्या टिप्स

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments