Hartalika Tritiya 2023 हरितालिका तृतीया या दिवशी महादेव-पार्वती मंत्र जपा, वैवाहिक जीवनात आनंद राहील
Hartalika Tritiya 2023 यंदा हरतालिका तीजचा व्रत 18 सप्टेंबरला आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी उपवास करतात. अनेक ठिकाणी अविवाहित मुलीही योग्य वर मिळण्यासाठी हरतालिका तीजचे व्रत आणि पूजा करतात. असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे खूप लाभदायक असते. या दिवशी महिला घरोघरी मातीपासून गौरी शंकराची मूर्ती बनवून त्यांची पूजा करतात. असे मानले जाते की पार्वतीने भगवान शंकरांना आपला वर मिळावा म्हणून हे व्रत केले होते. अशा स्थितीत अखंड सौभाग्याची इच्छा असणाऱ्या महिलांनी हरतालिका तीजचे व्रत अवश्य पाळावे. तसेच गौरी शंकराच्या काही विशेष मंत्रांचा जप करावा. चला जाणून घेऊया या मंत्रांबद्दल...
महादेवाचे मंत्र
ॐ नम: शिवाय
ॐ महेश्वराय नमः
ॐ पशुपतये नमः
पार्वती देवींचे मंत्र
ॐ पार्वत्यै नमः
ॐ उमाये नमः
या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:
सिंदूर अर्पण करण्याचा मंत्र
सिंदूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिंदूरं प्रतिगृह्यताम्।।
सौभाग्य प्राप्ती मंत्र
देहि सौभाग्यं आरोग्यं देहि मे परमं सुखम्।
पुत्र-पौत्रादि समृद्धि देहि में परमेश्वरी।।
इच्छित पती मिळविण्यासाठी मंत्र
हे गौरी शंकर अर्धांगिनी यथा त्वं शंकर प्रिया।
तथा माम कुरु कल्याणी कांतकांता सुदुर्लाभाम्।।
पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंत्र
नमस्त्यै शिवायै शर्वाण्यै सौभाग्यं संतति शुभा।
प्रयच्छ भक्तियुक्तानां नारीणां हरवल्लभे।
या दिवशी महादेव आणि सखी-पार्वती चे पूजन, आरती आणि कथा केल्याचे खूप महत्तव आहे. या दिवशी स्त्रिया जागरण करुन महादेव आणि देवीची आराधना करतात.