शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Updated : रविवार, 8 सप्टेंबर 2024 (10:34 IST)

Rishi Panchami 2024 ऋषिपंचमी पूजा पद्धत

Rishi Panchami 2024  भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला 8 सप्टेंबर रोजी हे व्रत केले जाणार आहे.
 
का करता ऋषिपंचमीची पूजा?
ऋषी पंचमीला ऋषी कश्यप यांची जयंती आहे.
या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते.
या दिवशी महिला कुटुंबातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी व्रत करतात.
गृहस्थाश्रमी पुरुष आचारसंपन्न व्हावा या हेतूने हे व्रत असतं. 
स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे निरसन होऊ शकते असे मानले जाते.
 
सप्तऋषि पूजन का मंत्र -
'कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥
दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः'॥
 
ऋषि पंचमी पूजा विधी
कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते.
या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात, स्नान वगैरे करतात आणि सप्त ऋषींच्या पूजेची तयारी करतात.
त्यासाठी भिंतीवर किंवा जमिनीवर हळदीने सात ऋषींची आकृती काढून पूजा करतात.
घराच्या स्वच्छ ठिकाणी हळद, कुंकू, रोळी इत्यादींचे चौकोनी वर्तुळ करून त्यावर सप्तऋषी बसवा.
सुगंध, फुले, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादींनी पूजा केल्यानंतर सप्तऋषींना पुढील मंत्राने अर्घ्य द्यावे.
 
सप्तऋषि पूजन मंत्र -
'कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥
दहन्तु पापं सर्व गृह्नन्त्वर्ध्यं नमो नमः'॥
या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते.