शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

प्रबोधिनी एकादशी अर्थात मोठी एकादशी

कार्तिक शुद्ध एकादशी ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11 ला होतो व कार्तिक शुक्ल 11 म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णू झोपी जातात म्हणूनच आषाढी एकादशीला "शयनी एकादशी" असे देखील म्हणतात. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे.  

शास्त्रांप्रमाणे एकादशी व्रत केल्याने व या दिवशी कथा श्रवण केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन करावे.

काय करतात या एकादशीला
 
क्षीरसागरात शयन करत असलेले श्री विष्णूंना उठवून मंगळ कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते.
 
मंदिर आणि घरामध्ये उसांचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो.
 
मंडपात शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो.
 
मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते.
 
या एकादशीला शालिग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं.
 
एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात.