शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी

vat purnima vrat puja vidhi
वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य
सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती 
धूप- दीप-उदबत्ती
तूप
पाच प्रकारची फळं (सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, चिकू)
फुले 
दिवा
वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा 
पाणी भरलेला लहान कलश 
हळद - कुंकू 
पंचामृत (तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्र करणे)
हिरव्या बांगड्या
शेंदूर 
एक गळसरी (काळी पोत)
अत्तर
कापूर
पूजेचे वस्त्र
विड्याचे पाने
सुपारी
पैसे
गूळ खोबऱ्याचा नैवेद्य
आंबे
दूर्वा
गहू
 
पूजन विधी:-
सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्यलंकार परिधान करावे.
सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करावी. 
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.
गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.
नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास इतर अजून एक सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी.
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
धागा बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करावी.
हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास, घरच्या घरी चौरंग मांडून पूजा करावी.
देवांचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवांना हळद कुंकू वाहून फुलं वाहावी. 
नंतर पंचामृताचं नेवैद्य दाखवावं. 
धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवावी. 
वटपौर्णिमा आरती
व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी. 
5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
भक्तीभावाने नमस्कार करून शिऱ्याचा अथवा फुटाण्याचा प्रसाद सर्वांना वाटावा. 
नंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा. 
सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.
या प्रकारे प्रार्थना करावी - `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
व्रत करणार्‍यांनी दिवसभर उपवास करून फळांचे सेवन करावे. काही जण हा उपवास त्यात दिवशी रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात. पण बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटोपून आंघोळ करून देवाची पूजा करतात. देवाला दही आणि भाताचा नेवैद्य दाखवूनही हा उपवास सोडला जातो.