Dharma Sangrah
✕

Sane Guruji Suvichar In Marathi साने गुरुजी यांचे विचार

Updated: शुक्रवार, 11 जून 2021 (09:32 IST)
पण पैसा हि आजची भाकर आहे.
 
जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व
ज्ञान शोधून काढले आहे असे नाही.
 
जिकडून जे घेता येईल,
ज्यांच्यापासून जे शिकाता येईल
ते आदराने घ्या.
 
जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील?
लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल?
 
जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते,
असत्य असते ते अदृश्य होते.
 
ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे,
वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे,
ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
 
ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत,
ती काय माणसे म्हणायची.
 
दुसऱ्याला हसणे फार सोपे असते
पण दुसऱ्या करिता रडणे
फार कठीण असते,
त्याला अंत:करण असावे लागते.
 
निर्बालांना रक्षण देणे
हीच बाळाची खरी सफलता होय.
 
भूतकाळातील काही गोष्टी आता
चुकीच्या वाटल्या तर
त्या दूर न करणे म्हणजे
भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी
जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही.
तो भूतकाळाचा गौरव नाही.
तो पूर्वजांचा गौरव नाही.
उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.
 
ध्येय सदैव
वाढतच असते.
 
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते
दु:ख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी.
 
निसर्गावर प्रेम करा,
निसर्ग आपली माता आहे.
 
मेघ सारे पाणी देवून टाकतात,
झाडे फळे देवून टाकतात,
फुले सुगंध देवून टाकतात,
नद्या ओलावा देवून टाकतात,
सुर्य चंद्र प्रकाश देतात
जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.
 
हृदयात अपार सेवा भरली कि
सर्व मित्रच दिसतात.
 
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
 
सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे
बर्फाच्या राशी वितळतात,
त्याप्रमाणे अहंकाराच्या
राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
 
मोतांच्या हारापेक्षा
घामाच्या धरांनीच मनुष्य शोभतो.
 
प्रेमाचे नाते
सर्वात थोर आहे.
 
सदाचार हा मनुष्याचा
खरा अलंकार आहे.
 
सुधारणा करण्याचे
अनेक मार्ग असतात.
 
भेदावर अभेद
हेच औषध आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments