रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

सैनिक सॅल्यूट का करतात ? असं का?

आपण बघितले असणार की सैनिक एखाद्याला सन्मान  देण्यासाठी सॅल्यूट करतात.पण असं  का करतात याचा विचार कधी केला आहे का? चला जाणून घेऊ या.
सॅल्यूट करण्याची पद्धत आपल्या इतिहासात खूप जुनी आहे.असं म्हणतात की सुरुवातीच्या काळात हे जमिनीवर वाकून किंवा गुडघ्यावर टेकून केले जात होते.सध्या केले जाणारे सॅल्यूट म्हणजे उजवा हात कपाळ पर्यंत किंवा डोक्यावर असलेल्या हॅट पर्यंत नेण्याची पद्धत देखील जुनी आहे.अठराव्या शतकाच्या शेवटी सैनिक अधिकाऱ्यांना टोपी काढून सॅल्यूट करीत असत.
आजही काही नागरी अधिकारी ही पद्धत वापरतात.डोक्यावरून टोपी न काढता हाताने सॅल्यूट करण्याची पद्धत अठराव्या शतकाच्या शेवटी सुरु करण्यात आली.असं म्हणतात की सैनिक बंदूक चालवायचे तेव्हा दारू-गोळ्या मुळे त्यांचे हात काळे व्हायचे अशा वेळी ते आपल्या अधिकाऱ्यांना टोपी काढून सॅल्यूट करताना टोपी घाण व्हायची.या साठी टोपी काढून सॅल्यूट करण्याची ही पद्धत बंद करण्यात आली.तसेच जे तलवार वापरणारे सैनिक असतात ते सॅल्यूट देण्यासाठी आपल्या तलवारीची मूठ आपल्या तोंडाच्या जवळ आणून उजवीकडे बघत सॅल्यूट देतात.सॅल्यूट करण्याची ही पद्धत केवळ आपल्या देशातच नाही तर जगातील सर्व देशांमध्ये वापरण्यात आहे.