बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (09:27 IST)

या राशींच्या मुली चांगल्या जोडीदार होऊ शकतात

लग्न एक असे पावित्र्य बंधन आहे ज्यामुळे दोन कुटुंब एकत्र येतात. असे म्हणतात की हे जोड्या वरूनच बांधल्या जातात. लग्न असे संस्कार आहेत जे फक्त दोन कुटुंबानाच आपसात जोडत नाही तर दोन लोकांना सात जन्मापर्यन्त बांधून ठेवतो. लग्नाचे नाव घेतल्यावरच मनात एक रोमांच येते. लग्नाचे नाव घेतल्यावरच मनात लाडू फुटतात. लग्नाचा लाडू सर्वानाच खावासा वाटतो. 
 
असे म्हणतात की लग्नाच्या गाठी वरूनच बनून येतात. ज्योतिष शास्त्रज्ञ म्हणतात की लग्न फक्त एका विशिष्ट व्यक्तीशी केले जाते, म्हणजे राशीच्या लग्न कुंडलीनुसारच लग्न जुळतात. 
 
सध्याच्या काळात लग्न ही एक फॅशन आहे जे प्रेम विवाहाच्या रूपात आपल्या सामोरी येतात. प्रेम विवाहात म्हणजे जो व्यक्ती आपल्याला मनापासून आवडतो त्यालाच आपले जोडीदार बनविले जाते. अशा लग्नात लग्न पत्रिका जुळवली जात नाही. त्यामुळे लग्न यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. आज आम्ही आपल्याला या लेखा मधून माहिती त्या मुलांसाठी देत आहोत ज्यांना लग्न करावयाचे आहे. पण त्यांना ही भीती असते की त्यांच्या जोडीदार कसा असणार. तर आम्ही आपणास सांगणार आहोत की आपण सहजपणे कसे ओळखू शकाल की आपला जोडीदार कसा असणार. फक्त आपल्याला त्यांची रास माहिती असायला हवी.
 
चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या राशीच्या मुली चांगल्या जोडीदार बनू शकतात.
* मेष राशी - 
या राशीच्या मुली खूप भाग्यवान असतात. म्हणून मेष राशीच्या मुलींसह लग्न केल्यावर नशीब चमकते या राशीच्या मुली वाचणे -लिहिणे आणि व्यवसाय सांभाळायला खूप चांगल्या असतात. या कमी बजेट मध्ये देखील व्यवस्थितरीत्या घर चालविण्यात दक्ष असतात.
 
* वृषभ राशी- 
या राशीच्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात. याना आपले काम शांतीने करायला आवडते. लग्नासारख्या पवित्र नात्याला निभावण्यासाठी या राशीच्या मुलीची निवड चांगली असते. या राशीच्या मुली नात्याला जोडून चालणाऱ्या असतात.
 
* मिथुन राशी -
या राशीच्या मुली सकारात्मक विचारसरणीच्या असतात पण त्याच बरोबर बोलक्या देखील असतात. या राशीच्या मुली आपल्या गोष्टी आणि विचारांनी प्रत्येकाचा मन जिंकण्यात पटाईत असतात. या राशीच्या मुली चांगल्या जोडीदार बनण्याची क्षमता ठेवतात.
 
* कर्क राशी -
या राशीच्या मुली स्वभावाने खूपच भावनिक असतात, छोट्या-छोट्या गोष्टींवर भावनिक होणे यांच्या स्वभावात समाविष्ट असते. या राशीच्या मुली प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक विचार ठेवणाऱ्या असतात. पण या मुलींमध्ये प्रत्येक परिस्थितीला सामोरी जाण्याच सामर्थ्य दांडग असतं आणि त्या परिस्थितीला व्यवस्थितरीत्या हाताळतात सुद्धा. या राशीच्या मुली आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या असतात.
 
* सिंह राशी -
या राशीच्या मुली खूप महत्वाकांक्षी आणि सुंदर व्यक्तिमत्त्वाच्या असतात. या आपल्या वैवाहिक जीवनाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक प्रकाराने सक्षम असतात. प्रेम यांच्या जीवनाचे मूळ असतात. या राशीच्या मुलींना आपल्या गोष्टींना गुपित ठेवायला आवडत .या एक चांगल्या जोडीदार म्हणून सिद्ध होतात.
 
* कन्या राशी -
या राशीच्या मुलींना भौतिक सुख सुविधांचे जीवन जगणे आवडत. यांना आपल्या जोडीदाराला खुश ठेवायची आणि त्याच्या साठी काही तरी करण्याची इच्छा असते. या भावनिक असतात आणि लवकरच कोणाच्याही सांगणात येतात.
 
* तूळ राशी -
या राशीच्या मुली आपल्या जीवनात खूप शिस्तप्रिय आणि आदर्शांवर चालणाऱ्या असतात. या मुली आपल्या घरासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. तूळ राशीच्या मुली आपल्या घराला घेऊन चालणाऱ्या असतात आणि प्रत्येक परिस्थितीत धोरणाने चालतात. 
 
* वृश्चिक राशी -
या राशीच्या मुली फारच चंचल असतात, त्याच बरोबर या खूप लवकर भावनिक होतात. या आपल्या मनात बऱ्याचश्या गुपित गोष्टी लपविण्यात माहीर असतात. आपल्या चेहऱ्यावर वेदना येऊ देत नाही. या मुली चांगल्या जोडीदार म्हणून सिद्ध होतात.
 
* धनू राशी -
जोडीदार म्हणून या मुली खूप प्रामाणिक असतात. त्याच प्रमाणे यांना रोमँटिक होणे देखील आवडते. खाण्या-पिण्या आणि भटकंतीची याना आवड असते. त्यांच्या साठी त्यांचे कुटुंब महत्त्वाचे असतात. चांगला स्वभाव असल्यामुळे या कोणाचे ही मन जिंकू शकतात.
 
* मकर राशी -
या मुली चांगले जोडीदार बनण्यासाठी सक्षम असतात. याना सहानुभूती घेणे आणि देणे खूप आवडते. या आत्मविश्वासी असतात 
म्हणून आयुष्याला आपल्या हिशोबाने चालवण्यात पटाईत असतात. प्रेमात स्वार्थ अजिबात आवडत नाही. प्रत्येक कामाला प्रामाणिकपणे करणं याना आवडत.
 
* कुंभ राशी -
या राशीच्या मुली खूप प्रेम करणाऱ्या असतात. या खूप गोड बोलणाऱ्या असतात आणि सोज्वळ स्वभावाच्या असतात. यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे संपूर्ण कुटुंब यांच्यावर खूप प्रेम करतात. कधी-कधी यांच्या जोडीत तणावाची स्थिती देखील येते. आपल्या हुशारीने सर्व समस्यांचा सामना करण्यास सक्षम असतात.
 
* मीन राशी -
या राशीच्या मुली आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. आपल्या स्वभावामुळे कोणाचेही मन जिंकून घेतात. आपण याना आपले जोडीदार म्हणून निवडू शकता, कारण यांचा स्वभाव निस्वार्थ आणि निष्पक्ष करणारा असतो. गंभीर आणि संवेदनशील असल्याने कोणीही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. 
 
या लेखामुळे आपण ठरवू शकता की आपला जोडीदार कसा निवडायचा किंवा निवडायची आहे.जेणे करून आपले पुढील आयुष्य चांगले निघणार.