Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकाकी आणि स्वतत मशगूल राहणारा म्हणजे मूलांक 8

Updated: बुधवार, 17 जुलै 2019 (10:08 IST)

स्वभाव-  मूलांक ८चा स्वभाव सामान्यत: गंभीर असतो. हे लोक बाहेरुन शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात वैचारिक घुसळण सुरूच असते. परतुं विषयाची मांडणी करताना ते विषयापासून दूर जातात. इतरांना मदत करायला ते तयार असतात, परंतु इतरांनी त्यांना मदत न केल्याची त्यांची तक्रार असते. उच्चपदस्थ व्यक्तीसमोर हे लोक सहज मान झुकवतात.

पुढे पहा मूलांक 8 च्या व्यक्तींचे गुण व अवगु


WD
व्यक्तिमत् व- मूलांक ८ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व उदार, गंभीर आणि रहस्यमय असते. ते निर्भीड असतात. ते उत्साही, सक्रिय आणि स्पष्टवक्ते असतात. अनेकदा ते आश्चर्यकारक कामं करुन जातात. अनेकदा या व्यक्ती उदास दिसतात. वेगवान प्रगती करण्याची भावना यांच्या मनात खदखदत असते. त्यांना घाई असते. पण अपयश आल्यास ते स्वतला दोष न देता इतरांना आपल्या भाग्याचे दोषी ठरवतात. भौतिक समृध्दी व सफलता यांबाबत मूलांक ८ हा सर्वाधिक अपयशी अंक मानला जातो. परंतु आध्यात्मिक उत्कर्षांसाठी हा अंक यशस्वी ठरतो.

गु ण- या व्यक्तींमध्ये बुध्दिमत्ता, गंभीरपणा, भावुकता, दूदर्शीपणा यांसारखे गुण असतात. स्वाभिमान तर यांच्यात सहज असतोच. ते उत्साही, सतत सक्रीय राहणारे आणि स्पष्टवक्ते असतात.

अवगु ण- या व्यक्तींना त्यांच्यावर झालेली निष्पक्ष टीका ऐकवत नाही. थोडय़ाशा विरोधानेही हे लोक विचलित होतात. यांच्याकडे झालेल्या दूर्लक्षामुळे त्यांना खूप त्रास होतो. घाई गडबडीत हे लोक चुकीचा निर्णय घेऊन बसतात, आणि त्यामुळे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते.

पुढे पहा 8 मूलांक असणार्‍यांची शुभ तिथी, दिवस व रं ग...


WD
शुभ तिथी- प्रत्येक महिन्याची २, ४, ८, ११, १३, १७, २०, २२ आणि २६ तारीख मूलांक ८ असलेल्या लोकांसाठी शुभ असतात.

शुभ दिव स- शनिवार हा तुमच्यासाठी सर्वाधिक अनुकूल दिवस आहे. बुधवार आणि शुक्रवारही तुमच्यासाठी शुभ ठरतील.
संबंधांसाठी शुभ मूलांक- मूलांक ८ असलेल्या लोकांचे मूलांक ४ असलेल्या व्यक्तींशी सामंजस्य चांगले असते. मूलांक २च्या व्यक्तीही त्यांच्यासाठी सफल ठरतात. मात्र मूलांक १, ३ व ९ पासून यांनी दूर राहिलेले चांगले.

शुभ रं ग- निळा, सफेद, राखाडी, हिरवा आणि वांगी रंग तुमच्यासाठी शुभ आहेत.

शुभ वर्ष े- ४, ८, १३, १७, २२, २६, ३१, ३५, ४०, ४४, ५३, ६२ आणि ६७वे वर्ष आपल्याला अनुकूल आहे.

पुढे पहा भाग्यशाली रत्न, मंत्र व उपा य...


WD
भाग्य रत् न- नीलमणी म्हणजे नीलम तुमच्यासाठी सर्वाधिक शुभ आहे. त्याला चांदीच्या अंगठीत ठेऊन शनिवारच्या दिवशी मधल्या बोटात घालणे शुभ ठरेल.

कल्याणकारी दे व- शनि, हनुमान आणि शंकराची उपासना केल्यास विशेष लाभ होईल.

कल्याणकारी मंत्र-
ॐ श्रीं शं शनैश्चराय श्रीं नम:
ॐ ह्रौं जूं स:
ॐ हं हनुमंते नम:

भाग्योदयकारी उपाय-संकटांपासून बचाव करण्यासाठी दर शनिवारी तेलाच्या दिव्यामध्ये स्वतचे प्रतिबिंब बघून तो दिवा देवळात लावा. तसंच दर शनिवारी लोखंडाच्या वस्तू, तेल, चामडय़ाच्या वस्तू किंवा काळ्या रंगाचे कपडे दान करा. मानसिक ताण आणि कठीण परीस्थितीच्या निवारणासाठी दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्यास लाभदायक ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

श्रावणात दररोज अशी करा महादेवांची आराधना; भाग्य उजळेल

श्रावणात उपवास करताय? जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम, आहार आणि योग्य पद्धत

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments