सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शनी देवाची क्रुर दृष्टी कसे ओळखाल, अशुभ संकेत जाणून घ्या

shani
शनीचे नाव ऐकताच लोक घाबरतात परंतु शनिला न्याय-प्रिय ग्रह मानले जाते. शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. वाईट कर्म करणाऱ्यांना शनी शिक्षा देतो. चांगले कर्म करणाऱ्यांवर शनी आपला आशीर्वाद देतो. म्हणूनच त्यांना न्यायाधीश म्हणतात. असे मानले जाते की ज्या लोकांना शनीची शुभ दृष्टी असते, त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. तर दुसरीकडे ज्याच्याकडे शनीची वक्र दृष्टी असते, त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे मानले जाते की जो कोणी शनिदेवाला क्रोधित करतो, त्याला राजाहून रंक बनण्यास वेळ लागत नाही. यामुळेच लोकांना शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्याचे अनेक उपाय आहेत, पण त्याआधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की शनि तुमच्यावर प्रसन्न आहे की कोपला आहे… 
 
ज्योतिष शास्त्रानुसार काही लक्षणांवरून आपण शनीची वाईट दृष्टी असल्याचे ओळखू शकतो.
ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीचे केस लवकर गळायला लागतात, परंतु सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे देखील केस झपाट्याने गळतात, त्यामुळे अशा वेळी शनीला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि उपासना करावी. सूर्याला बलवान बनवण्यासाठी सकाळी नियमितपणे तांब्याच्या भांड्यात सूर्याला पाणी घालावे.
 
ज्योतिषांच्या मते जेव्हा एखाद्याचा शनी जड असतो तेव्हा कपाळाचे तेज कमी होऊ लागते. काही लोकांच्या कपाळावर काळेपणाही दिसू लागतो. तसे असेल तर तुम्ही सावध व्हावे. अशा परिस्थितीत तुमचा आदर कमी होऊ शकतो.
 
शनीच्या अशुभ प्रभावामुळे कुटुंब आणि व्यवसायात अडचणी येऊ लागतात. कामही बिघडू लागते. आगीमुळे तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब शनिदेवाची प्रार्थना करावी आणि शनीला अनुकूल होण्यासाठी उपाय करावेत.
 
जेव्हा शनि भारी असतो तेव्हा माणसाला तेलकट, मांसाहारी पदार्थ जास्त आवडतात. शुद्ध माणसाची आवडही मांस आणि दारूमध्ये वाढू लागते. जर एखाद्याची आवड या गोष्टींकडे जाऊ लागली तर त्याने विशेष काळजी घ्यावी आणि या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जेव्हा शनिदेवाचा अशुभ प्रभाव असतो तेव्हा माणसाच्या स्वभावात क्रोध आणि खोटेपणाची भावना वाढू लागते. तो धर्माच्या कार्यापासून विचलित होऊ लागतो. चुकीच्या सट्टेबाजीसारख्या वाईट सवयी एखाद्या व्यक्तीमध्ये विकसित होऊ लागतात. या सवयी माणसाला गरिबीकडे घेऊन जातात. वाईट कृत्यांसाठी शनि कठोर शिक्षा देतो.