Festival Posters
✕

कोरोना व्हायरस : आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवतो काढा

Updated: सोमवार, 4 मे 2020 (12:26 IST)
काढा बनविण्याची कृती : पिंपळ, सुंठ आणि काळे मिरे सम प्रमाणात मिसळून ह्याची बारीक भुकटी बनवावी. या तिन्ही पदार्थापासून तयार केलेले हे त्रिकूट चूर्णाला 1 लीटर पाण्यात 3 ते 4 तुळशीचे पानं घालून पाण्याचे प्रमाण अर्धे होयपर्यंत उकळून घ्यावे. दिवसभरातून 1 - 1 कप कोमट काढ्याला 3 - 4 वेळा प्यायला हवे. 
 
आहारतज्ज्ञ सांगतात की कुठल्याही रोगाशी लढण्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी. हा काढा त्यासाठी फायदेशीर आहे. या साठी पिंपळ, सुंठ आणि काळे मिरे वापरले आहे. 
 
त्या सांगतात की पिंपळाची साल आणि पिंपळ पाने आयुर्वेदात बऱ्याच काळापासून वापरण्यात आहे. ह्याचा फायद्याविषयी बोलायचे झाले तर पिंपळ पोटदुखी आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी वापरले जाते. पिंपळामध्ये अँटिमायक्रोबियल आढळतात जे शरीरात जाऊन सूक्ष्म जंतांना वाढू देत नाही. काळी मिरीने अन्नाची चव तर वाढतेच. त्याच बरोबर त्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. 
 
काळी मिरी मध्ये अँटीऑक्सीडेन्ट आढळून येते. ज्यामुळे आपली प्रतिरोधक शक्ती बळकट होते. अँटी ऑक्सीडेन्ट मिळविण्यासाठी हे चांगले स्रोत आहे. घसा दुखणे, घसा खवखवणे, टॉन्सिल्स सारख्या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काळीमिरीचा वापर आवर्जून केला जातो. आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने काळीमिरी जास्त प्रमाणात वापरली जाते आणि काढा करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. 
 
सुंठ बद्दल सांगायचे म्हणजे आलं चांगले प्रकारे वाळविल्यानंतर ते सुंठ बनते. सुंठाचा वापर सुद्धा काढ्यामध्ये केला आहे. ह्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सीडेंट असतात. याला अँटिमायक्रोबियल थेरेपी सुद्धा म्हणतात. काळीमिरी, सुंठ, पिंपळ मध्ये व्हिटॅमिन के आढळते जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. ह्यामुळेच काढ्यामध्ये या तिन्ही वस्तूंचा समावेश असतो. 
 
तुळशीचे धार्मिक महत्व तर आहेच त्याच बरोबर आरोग्यासाठीदेखील तुळस फायदेशीर आहे. तुळशीमध्ये उपचारात्मक वैशिष्ट्ये पण भरपूर आहे. अनेक रोगांच्या उपचारासाठी तुळशीचा वापर केला जातो. 
 
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अति प्रमाणात काहीही केले तर त्याचा त्रास होतोच त्याच प्रमाणे या काढ्याच्या अति सेवन केल्याने हे आपल्या साठी नुकसानदायक ठरू शकते. काढ्याला योग्य प्रमाणातच घ्यायला हवे. आपण या आरोग्यवर्धक काढ्याला दिवसांतून 3 - 4 वेळा घ्यायला हवे या शिवाय आपण कोमट पाण्यात दालचिनी टाकून प्यायल्याने घशाच्या वेदनेपासून त्वरित मुक्ती मिळू शकते.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडा मसाला रेसिपी, योग्य प्रमाण जाणून घ्या

जोड़ीदार तुमची बाजू घेत नाही? नात्यातील या अपेक्षांवर शांतपणे चर्चा करा

Navratri Garba Look नवरात्रीत दांडिया नाईटसाठी परफेक्ट ज्वेलरी गाईड; पाहा लेटेस्ट ट्रेंड्स

पाण्याची टाकी नेहमी उंचीवर का ठेवली जाते? यामागील विज्ञान जाणून घ्या...

हार्ट अटॅकची केवळ 'ब्लॉकेज' हेच कारण नाही; डॉक्टरांनी सांगितलेली ही ५ कारणे दुर्लक्षित करू नका!

पुढील लेख
Show comments