शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (11:41 IST)

मुलांमध्ये हीमोग्लोबीनची कमी असल्याचे कसे ओळखाल....

आरोग्याची काळजी घेणे अत्यन्त महत्वाचे असते मग ते घरातील वयोवृद्धांची असो, स्वतःची असो, किंवा लहान मुलांची. मुलं खाण्यासाठी फार त्रास देतं असतात. त्यांना त्यांचा आवडीचे पदार्थ मिळाले नाही तर ते फार उच्छाद मांडतात, धिंगाणा घालतात. जेवतच नाही आणि हट्टी होतात. अश्याने त्यांची प्रकृती खालवत जाते. पण काही वेळेस मुलांच्या वागणुकीमध्ये काहीसा बदल दिसल्यास काही काळजीचे तर नाही न ह्याचा कडे लक्ष देणे गरजेचे असते. 
 
लहान मुलांमध्ये हीमोग्लोबीनची कमतरता आढळते. हीमोग्लोबीनची कमी शरीरामधील रक्त कमी असल्याने होते. शरीरांमधील हीमोग्लोबीनची कमी होणे अत्यंत काळजीची बाब आहे. आपल्या पाल्यामध्ये अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असते. बघू या काय असतात ते लक्षणे.
 
* चिडचिड करणे - मुलं जरा जराश्या कारणाने चिडचिड करू लागतात. कधी कधी तर ते कुठल्या गोष्टींवरून चिडचिड करत आहे स्वतःलाच समजत नाही.

* भूक न लागणे - मुलांची पचन करण्याची क्षमता चांगली असते. त्यांना वेळोवेळी काहीं काही खायला हवं असतं. पण हीमोग्लोबीन कमी असल्यास मुलांना भूक लागत नाही. असे आढळ्यास वेळच्यावेळी चिक्तित्सकांचा परामर्श घ्या.
 
* थकवा येणे - मुलांना थकवा कधी ही जाणवत नसतो. ते नेहंनीच फ्रेशच असतात. पण मुलं कोणतेही काम न करता सारखे झोपत असतील किंवा खेळत नसतानाही थकून जात असतील तर ही हीमोग्लोबीन कमी असल्याची लक्षणेही असू शकतात. वेळे वर लक्ष देणे गरजेचे आहे.
 
* त्वचेचं रंग बदलणे - शरीरातील हीमोग्लोबीन कमी झाले असल्यास त्वचेचा रंग बदलतो त्वचा पांढरी किंवा पिवळी पडते. असे असल्यास त्यांचा आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करावा आणि त्वरित चिकित्सकांच्या योग्य परामर्श घ्या. 
 
हीमोग्लोबीनची कमी असल्यास त्यांचा आहारामध्ये आयरन, खनिज, व्हिटॅमिन, प्रथिनं, कार्बोजयुक्त पदार्थांचा समावेश असावा. खजूर, बीटमध्ये भरपूर मात्रात आयरन आढळतं. तेव्हा आपल्या मुलांचा आहारात पौष्टिक तत्वांचा समावेश करावा आणि वेळोवेळी डॉक्टरांचा परामर्श घ्यावा.