शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (10:08 IST)

व्यायामाच्या दरम्यान चुकून ही या 5 गोष्टींना विसरू नका.

व्यायाम हे प्रत्येकासाठी फायदेशीर असतं, गरज आहे तर केवळ आपल्या वयाला आणि आरोग्यानुसार योग्य व्यायाम निवडून आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची. परंतू या व्यतिरिक्त 5 अश्या काही गोष्टी आहे ज्या चुकून देखील व्यायामाचा दरम्यान दुर्लक्षित करू नये.
 
1 वॉर्म अप - व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे बंधनकारक आहेत, जेणे करून आपले शरीर व्यायामासाठी पूर्णपणे तयार असेल. जर आपण वॉर्मअपला दुर्लक्ष करत असाल तर, हे आपल्या शरीरास हानिकारक ठरु शकतं.
 
2 फॉर्म - आपण व्यायामाच्या ज्या प्रकाराला करत आहात, त्याला नियमानुसार तसेच करावं, ज्या प्रमाणे सांगितले आहेत. आपल्यानुसार अजिबात बदल करू नये, अन्यथा आपल्या शरीरास हे त्रासदायक ठरु शकतं.
 
3 नवीन लोकांसाठी - व्यायामाच्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात व्यायाम करणं टाळावं आणि प्रशिक्षकाप्रमाणे व्यायाम करावं. एका आठवड्यात ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्यापेक्षा जास्त करणं शरीरास त्रासदायक ठरू शकतं.
 
4 आहार - आहाराबरोबर व्यायामाचीही काळजी घ्या आणि वेगानं पचवणाऱ्या प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट पर्याय निवडा. हे शरीरात अमिनो ऍसिडच्या पुरवठा करण्यासह स्नायू तयार करण्यात मदत करतं.
 
5 वय - व्यायाम करणं सर्व वयाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे, पण व्यायामाची निवड आपल्या वयाच्या मानाने करावी आणि सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जर आपल्याला काही आरोग्याविषयी तक्रार आहे त्या बद्दलची काळजी घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.