मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (15:26 IST)

हिवाळ्यातील आजार आणि त्यावर उपचार

जेव्हा हवामान बदलतो, माणसांमध्ये आजार उद्भवू लागतात. सध्याच्या दिवसात तापमानात झालेल्या बदलमुळे थंडी वाढली आहे. जेणे करून बरेच आजार असे आहेत जे होण्याचा धोका वाढला आहे. सध्याच्या काळात घरातील ज्येष्ठ मंडळी आणि मुलांना या आजाराचा धोका जास्त आहे. परंतु हिवाळ्यात तर कोणीही आजारी होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या त्या आजारांबद्दल जे हिवाळ्यात लोकांना आजारी करतात आणि त्या पासून बचाव करण्याचे उपाय.
 
हिवाळ्याच्या हंगामात लोकांना सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे सर्दी-पडसं -खोकला बहुतांश लोक या हवामानात या आजाराने ग्रस्त असतात. लोकांच्या घशात खव-खव होते, या मुळे ह्यांना खूप त्रास होतो. परंतु जर सर्दी-पडसे असेल तर सर्वप्रथम थंड वस्तूंचे सेवन करणे टाळावे. जसे की थंड पाणी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या भाज्या आणि फळे.
 
 या शिवाय उबदार आणि उष्ण कपडे घालावे आणि गरम वस्तू जसे की सूप, काढा इत्यादींचे सेवन करावे. घसा खवखवत असेल तर मिठाच्या पाण्याचे गुळणे करावे. या हंगामात लोकांना धुकं आणि थंडी वाढल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. दम्याच्या रुग्णांचा त्रास जास्तच वाढतो. म्हणून अश्या लोकांनी आपल्या जवळ इन्हेलर बाळगावे तसेच बहुतेक लोकांना या दिवसात रक्तदाब वाढण्याची समस्या देखील होते. रक्तदाब जास्त असेल तर हृदयाशी निगडित त्रास वाढू शकतात. त्यांच्या पासून मुक्त होण्यासाठी पूर्ण व्यायाम, योग्य आहार आणि उपचारावर लक्ष दिले पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला काही दुखापत झाली असेल तर त्याची वेदना हिवाळ्यात जास्त होते. किंवा घरातील ज्येष्ठ नागरिकांना बहुतेक वेळा सांधे दुखीची तक्रार असते, हे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवते. 
 
अश्या परिस्थितीत धोत्र्याच्या पानाला तेल लावून गरम करा आणि हे पान वेदना असलेल्या ठिकाणी बांधून द्या, या मुळे सांधेदुखी मध्ये आराम मिळतो. या शिवाय मोहरीच्या तेलात काही लसणाच्या कांड्या टाकून शिजवून घ्या आणि थंड झाल्यावर हे तेल वेदना असलेल्या ठिकाणी चोळून घ्या. या मुळे वेदनेपासून त्वरितच आराम मिळतो.