गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (22:09 IST)

मुल माती खात असल्यास हे उपाय करा

मुलांना लहानपणी वाईट सवय लागते आणि ती आहे माती खाण्याची.या मुळे मुलं आजारी पडतात जर आपल्याही बाळाला ती सवय असल्यास हे काही उपाय अवलंबवा जेणे करून त्याची ही वाईट सवय जाईल आणि तो माती खाणे विसरेल .
 
* केळी खायला द्या-
मुलं माती खात असेल तर त्याला केळी खायला द्या. या साठी केळी मॅश करावे त्यात मध मिसळून खाऊ घाला. असं केल्याने मुलांची माती खाण्याची सवय नाहीशी होते. 
 
 * हिरव्या पाले भाज्या -
मुलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यावर मुलं माती खातो. ही सवय सोडविण्यासाठी आपण मुलांना हिरव्या पाले भाज्या खाऊ घालाव्यात. कारण या मध्ये मुबलक प्रमाणात आयरन असतात. तसेच आपण मुलांना बीटरूट आणि डाळी किंवा इतर वस्तू देखील खायला देऊ शकता. या मुळे मुलांना फायदा होतो.   
 
* ओवा खाऊ घाला- 
मुलांना आपण ओवा देऊ शकता. या साठी  मुलाला झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह ओवा द्या. असं केल्याने मुलाची माती खाण्याची सवय बदलू शकते. 
 
* लवंग द्या- 
मुलांना माती खाण्याची सवय सोडविण्यासाठी लवंग आपली मदत करू शकते. या साठी लवंग बारीक वाटून पाण्यात मिसळून उकळवून घ्या आणि हे पाणी थंड करून मुलांना थोडं थोडं पाजून द्या.