Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाळिशीनंतरची तंदुरुस्ती

Updated: सोमवार, 7 जानेवारी 2019 (08:46 IST)
 
चाळिशीनंतर महिलांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. या वयात त्यांच्या चयापचय क्रियेचा वेगही मंदावतो. पण विविध धान्यांच्या सेवनानं या दोन्हींचा सामना करणं शक्य होतं. खरं तर तिशीनंतरच टप्प्याटप्यानं चयापचय क्रिया मंदवण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पांढरा ब्रेड किंवा पांढरा भात याऐवजी महिलांनी ब्राउन राईस, व्हिट ब्रेड किंवा ओट्स खायला पाहिजे. यामुळे शरीराला फायबर मिळेल. फायबरमुळे वजन वाढण्याला प्रतिबंध होतो आणि वजन कमी व्हायलाही मदत होते. 
 
आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा. सॅलेड, कोशिंबिरी हासुद्धा फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. पालक, गाजर, काकडी, टॉमेटो, संत्री, स्ट्रॉबेरी अशा पदार्थांचं सेवनही महत्त्वाचं ठरतं. 
 
फायबरबरोबर पोटॅशियम, क जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. यामुळे त्वचा चांगली राहते व सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव होतो. 
 
आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करायला हवं. मीठामुळे शरीरात पाणी साचून राहतं आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. त्याबरोबर किडनी, धमन्या, हृदय, मेंदू यांनाही धोका पोहचू शकतो. 
 
चाळिशीनंतर मधुमेहाचा धोका वाढतो. शक्यतो साखर आणि गोड पदार्थ टाळावेत. साखर जास्त प्रमाणात खाल्यानं वयस्कर दिसू लागता.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हात-पायांना मुंग्या येण्यामागे कोणती कारणे असू शकतात? जाणून घ्या

NPCC Recruitment :एनपीसीसी लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदासह २६ पदांसाठी भरती, पात्रता इतर माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments