गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (08:00 IST)

पावसात संक्रमण कसे टाळावे,या 8 खबरदारी घ्या

पावसाळा आल्यावर मन आनंदित होते.सर्वत्र हिरवळ दिसते.हा हंगाम आपल्यासह अनेक आजार देखील घेऊन येतो.या हंगामात संसर्ग होण्याच्या धोका होतो.आणि ते कोणत्याही प्रकारे होऊ शकतं.
 
चला जाणून घेऊ या की या हंगामात कश्या प्रकारे खबरदारी घ्यावी.
 
1  पावसात कधीही ओले केस बांधू नका.यामुळे आपल्या डोक्यात संसर्ग होण्याचा  धोका वाढू शकतो.जसे खाज येणे, पुरळ उठणे, पुटकुळ्या होणं.इत्यादी.
 
2 पावसाळ्यात ओले झाल्यास किंवा कपडे ओले असल्यास ते घालू नका.या मुळे त्वचेशी संबंधित त्रास होऊ शकतात.फंगल इन्फेक्शन देखील होऊ शकतं.
 
3 आपल्या हाताची नखे वाढवू नका.या मध्ये घाण साचून राहते आणि ही घाण आपल्या पोटात जाऊ शकते.आणि या मुळे आपण आजारी होऊ शकता.म्हणून वेळीच नखे कापून घ्या.
 
4 शूज पूर्णपणे कोरडे करूनच घाला.बऱ्याच वेळा ऑफिस किंवा बाहेर जाताना हलके ओलसर मोजे किंवा शूज घालतो असं करणे धोकादायक असू शकतं.
 
5 पावसाळ्यात बाहेरचे काहीही खाणे टाळा.दूषित अन्न,पदार्थ खाल्ल्याने अन्नातून  विषबाधा होण्याचा धोका असतो.
 
6 बऱ्याच वेळा घाई-घाईने ओलेच कपडे घालतो असं करू नका.या मुळे आपल्याला संसर्ग होण्याचा त्रास उद्भवू शकतो.
 
7 पावसाळ्यात सॅलड कापल्यावर लगेच त्याला खाऊन घ्यावे.तसे तर पावसाळ्यात  कच्च्या भाज्या खाऊ नये असे सांगतात. कारण पावसाळ्यात आपली पचन शक्ती कमकुवत होते.
 
8 दूषित पाणी प्यायल्याने अतिसार होतो.जर असं होत असेल तर पाणी उकळवूनच थंड करून प्यावं.